विनोद कांबळीच्या प्रकरणात सचिन तेंडुलकरला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न

| Updated on: Dec 10, 2024 | 2:47 PM

विनोद कांबळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याची अवस्था पाहून अनेकांना वाईट वाटत आहे. अनेकांनी त्याला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणात लोकं सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरला विलन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर कपिल देव यांनी उत्तर दिले होते.

विनोद कांबळीच्या प्रकरणात सचिन तेंडुलकरला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न
Follow us on

दिग्गज अष्टपैलू आणि माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केलंय. त्याने संकटावर मात करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. विनोद कांबळी याला अल्कोहोल आणि इतर आरोग्याच्या समस्या आहेत. दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक नसल्याचं दिसलं होतं. सचिन आणि तो बालपणीचे मित्र आहेत. तो सचिन तेंडुलकरचा हात धरून थांबत होता.

कपिल देव यांनी विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल दु:ख व्यक्त केले. कपिल देव म्हणाले की, ‘आपण सर्वांनी मिळून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्यापेक्षा त्याने स्वतः स्वत:कडे लक्ष द्यायला हवे. जर एखादी व्यक्ती स्वतःची काळजी घेऊ शकत नसेल तर आपण त्याची काळजी घेऊ शकत नाही. सोशल मीडियावर विनोद कांबळीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सचिन तेंडुलकरला याबाबतीत मदत करण्याचं आवाहन केले जात आहे. सचिनला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु कपिल देव यांनी सचिनच्या आलोचकांना उत्तर दिले आहे.

कपिल देव म्हणाले की, ‘आम्ही जे काही पाहिलं त्यामुळे सर्व दु:खी आहोत. जवळच्या मित्रांनी त्याला काही मदत करावी अशी माझी इच्छा आहे. ज्यामुळे तो स्वतःची काळजी घेऊ शकेल. त्याला पुनर्वसनात परत जावे लागेल. लोकांना ही समस्या असते तेव्हा पुन्हा पुनर्वसनात जावे लागते. विनोद कांबळी यांना ड्रग्जचे व्यसन आहे. त्यामुळेच तो समाजापासून दूर गेला. असं ही ते म्हणाले.

विनोद कांबळीने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड दिलंय. 2012 मध्ये त्याची ‘अँजिओप्लास्टी’ झाली होती. 2013 मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका देखील आला होता. त्याचा दारूचे व्यसन देखील आहे. त्यामुळे त्याला अनेकदा पुनर्वसन केंद्रात जावे लागले होते. त्यामुळे त्याच्या एकूण सर्व आरोग्यावर मोठा परिणाम झालाय.

विनोद कांबळीने भारतासाठी 104 वनडे आणि 17 कसोटी सामन्यांमध्ये अनुक्रमे 2477 आणि 1084 धावा केल्या आहेत. कांबळीने शालेय स्तरावर सचिनसोबत 664 धावांची ऐतिहासिक अखंड भागीदारी केली होती. याच भागीदारीमुळे आणि त्याच्या 300 हून अधिक धावांच्या खेळीमुळे तो आणि सचिन प्रसिद्ध झाला होता.