IPL 2022 LIve : कोट्यवधींच्या बोलीचा पुकारा करणारेच चक्कर येऊन कोसळले, आयपीएलचा लिलाव थांबला

| Updated on: Feb 12, 2022 | 2:56 PM

टाटा आयपीएल (TATA IPL) च्या 15 व्या सीजनसाठी बँगलोर येथे सध्या महा लिलाव (IPL Mega Auction) सुरु आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ऑक्शनला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 25 ते 30 खेळाडूंचा लिलाव पूर्ण झाला आहे.

IPL 2022 LIve : कोट्यवधींच्या बोलीचा पुकारा करणारेच चक्कर येऊन कोसळले, आयपीएलचा लिलाव थांबला
Auctioneer Hugh Edmeades
Follow us on

बंगळुरु : टाटा आयपीएल (TATA IPL) च्या 15 व्या सीजनसाठी बँगलोर येथे सध्या महा लिलाव (IPL Mega Auction) सुरु आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ऑक्शनला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 25 ते 30 खेळाडूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. मात्र या लिलावादरम्यान, एक धक्कादायक घटना घडली. लिलाव सुरु असताना लिलाव पुकारणारे ह्यू एडमीड्स (Hugh Edmeades) यांना चक्कर येऊन ते कोसळले. लिलावादरम्यान मेडिकल इमरजन्सी निर्माण झाली आहे. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिन्दु हसारंगावर बोली लावत असताना ही घटना घडली. सध्या लिलाव थांबवण्यात आला आहे. ह्यू एडमीड्स हे मूळचे ब्रिटीश ऑक्शनर आहेत. त्यांचं वय 63 आहे.

2.30 ते 3.30 ही वेळ दुपारच्या जेवणासाठीची असल्याने आता सर्व फ्रँचायझी मालक आणि संबंधित लोक जेवणासाठी गेले आहेत. त्यामुळे 3.30 नंतरच उर्वरित लिलाव प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

4 वर्षांपासून आयपीएलचे लिलावकर्ता

ह्यू एडमीड्स 2019 मध्ये आयपीएल लिलावासाठी आले होते. गेली चार वर्ष तेच लिलाव पुकारत आहेत. त्यांनी वेल्सच्या रिचर्ड मॅडली यांची जागा घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की एडमीड्स पुन्हा एकदा लिलावकर्ता म्हणून परत येत आहे. अरुण धुमाळ म्हणाले होते की. एडमीड्स यांनी याआधीसुद्धा लिलावकर्ता म्हणून उत्तम काम केले आहे. ते पहिल्यांदाच महा लिलावात बोली लावण्यासाठी आले आहेत. त्यांच्या आधी रिचर्ड मॅडली लिलाव सांभाळत असे. त्यांनी जगभरात 2700 पेक्षा जास्त ऑक्शनची जबाबदारी संभाळली आहे. 1984 मध्ये एडमीड्स यांनी पहिल्यांदा ऑक्शनसाठी बोली पुकारली होती.

इतका मोठा लिलाव कधी केला नाही : एडमीड्स

लिलावापूर्वी एडमीड्स क्रिकेट डॉटकॉमसोबत बोलताना म्हणाले होते की, “मी इतका मोठा लिलाव कधीच केलेला नाही. आयपीएलचा लिलाव खूप वेळ चालतो. लिलावासाठी माझ्या आत कुठून इतकी उर्जा येते हे मला माहीत नाही. दोन दिवसांच्या लिलावानंतर, 14 फेब्रुवारीला लंडनला परतताना मी चांगली झोपन घेईन.”

एडमीड्स यांच्या तब्येतीत सुधारणा

ह्यू एडमीड्स यांना आता बरं वाटत असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं लक्ष आहे. लवकरच मेगा ऑक्शन सुरु होईल असं स्टार स्पोटर्सने टि्वटमध्ये म्हटलं आहे.

इतर बातम्या

IPL 2022 Auction Day 1 Live Updates: मेगा ऑक्शनमध्ये दिसला शाहरूखचा मुलगा, चाहता म्हणाला, ‘शेर का बच्चा आ गया’

IPL 2022 auction: बोली पुकारताना चक्कर येऊन कोसळले ते ह्यू एडमीड्स कोण आहेत?