मुंबई : ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 101 टक्के वाढीची घोषणा केली. कंपनीने 3293 रिटेल युनिट्सच्या उत्तम विक्रीची नोंद केली. ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या पाच इलेक्ट्रिक कार्स आणि पेट्रोल इंजिन सुसज्ज क्यू-रेंजसह ए-सेदान्समुळे ही वाढ शक्य झाली. ऑडी ए 4, ऑडी ए 6, ऑडी क्यू 2, ऑडी क्यू5 आणि ऑडी क्यू 8 या कार्स ब्रॅण्डसाठी व्हॉल्यूम सेलर्स आहेत. आरएस व एस परफॉर्मन्स कार्सनी प्रबळ मागणी कायम राखली आणि 2022 साठी उत्तम ऑर्डरची नोंद केली आहे. (Audi India Sales Registered 101 percent Growth In 2021, around 3,293 Cars Sold)
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग ढिल्लों म्हणाले, “महामारीची दुर्दैवी दुसरी लाट आणि सेमी-कंडक्टर, वस्तूंच्या किंमती, शिपमेंटसंबंधी आव्हाने इत्यादींसारख्या इतर जागतिक समस्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना झुगारून 2021 मधील आमच्या कामगिरीबाबत आम्हाला आनंद होत आहे. 101 टक्क्यांच्या वाढीसह आमची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहे.”
बलबीरसिंग म्हणाले की, “2021 हे आमच्यासाठी मोठे वर्ष होते. या काळात आम्ही आमचे नऊ नवीन मॉडेल्स लाँच केले आणि आम्ही पाच इलेक्ट्रिक कार लाँचसह भारतीय ईव्ही बाजारपेठेत प्रवेश केला. सध्या आम्ही पाच इलेक्ट्रिक कार्स असलेला एकमेव ब्रॅण्ड आहोत. ऑडी क्यू 8, ऑडी ए 4, ऑडी ए 6 व आमच्या आरएस मॉडेल्स यांसारख्या उत्पादनांनी त्यांची प्रबळ कामगिरी कायम राखली आहे आणि आमच्याकडे 2022 च्या सुरूवातीलाच मोठ्या ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. रिटेलसंदर्भात आम्ही नवीन कार्स शोरूम व वर्कशॉप्स सुरू करण्यासोबत 2021 मधील आमच्या पूर्व-मालकीच्या कार सुविधांमध्ये दुप्पट वाढ देखील केली आहे.”
बलबीरसिंग म्हणाले की “2022 हे ऑडी इंडियासाठी आणखी एक पॉवर-पॅक वर्ष असणार आहे. आम्ही कस्टमर सेन्ट्रिसिटी, डिजिटायझेशन, प्रॉडक्ट्स व नेटवर्कवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आमच्या स्ट्रॅटेजी 2025 वर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवू. आकारमान, कामगिरी व इलेक्ट्रिक कार्सच्या आमच्या उदयोन्मुख पोर्टफोलिओसह आम्ही आमच्या ग्राहकांसाठी लग्झरीला पुनर्परिभाषित करणे सुरूच ठेवू. आम्ही देशामध्ये आमच्या पूर्ण क्षमतेने युक्त मॉडेल्स सादर करू. आम्हाला आगामी महिन्यांमध्ये प्रबळ कामगिरीचा विश्वास आहे.”
ऑडी इंडिया स्थिर व लाभदायी ब्रॅण्ड म्हणून उदयास येण्याच्या ध्येयाशी एक पाऊल जवळ पोहोचली आहे. प्रत्येक कार्यामध्ये ग्राहकांना प्राधान्य देत ऑडी इंडिया स्ट्रॅटेजी 2025 वरील प्रबळ भर कायम ठेवेल.
ऑडी इंडियाच्या उत्पादनांच्या सध्याच्या कार रेंजमध्ये ऑडी ए 4, ऑडी ए 6, ऑडी ए 8 एल, ऑडी क्यू 2, ऑडी क्यू 5, ऑडी क्यू 8, ऑडी एस 5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 7, ऑडी आरएस क्यू 8, ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आदी कार्सचा समावेश आहे.
इतर बातम्या
Piaggio लवकरच 150cc इंजिनवाली स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स
ढासू फीचर्स आणि शानदार लूकसह भारतातली पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लाँचिंगसाठी सज्ज
Best Hatchback Cars : भारतीयांच्या खिशाला परडवणाऱ्या हॅचबॅक कार, पाहा टॉप 5 गाड्या
(Audi India Sales Registered 101 percent Growth In 2021, around 3,293 Cars Sold)