मेलबर्न: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकला आहे. मेलबर्नमध्ये हा कसोटी सामना झाला. 3 कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास, ऑस्ट्रेलियाने ही टेस्ट सीरीज जिंकली आहे. या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आपला 16 वर्षाच वनवासही संपवला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची टेस्ट सीरीज 16 वर्षापूर्वी जिंकली होती.
ऑस्ट्रेलियाने कसा विजय मिळवला?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील हा कसोटी सामना पूर्ण 4 दिवसही चालला नाही. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळ आटोपला. ऑस्ट्रेलियाने मैदान मारलं. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 182 धावांनी हरवलं. चौथ्या दिवसाची सुरुवात झाली, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या हातात 9 विकेट होत्या. पण दुसऱ्या सेशनचा खेळ पूर्ण होण्याआधीच दक्षिण आफ्रिकेची टीम ऑलआऊट झाली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 204 धावात आटोपला. याआधी ऑस्ट्रेलियाने सीरीजचा पहिला कसोटी सामना 6 विकेटने जिंकला होता.
ऑस्ट्रेलियाने पहिला डाव किती धावांवर घोषित केला?
मेलबर्नमध्ये हा कसोटी सामना झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावात आटोपला. सलग 7 व्यां दा दक्षिण आफ्रिकेची टीम टेस्ट इनिंगमध्ये 200 धावा करु शकली नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 8 विकेट गमावून 575 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
100 व्या कसोटी वॉर्नरची कमाल
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात डेविड वॉर्नरने डबल सेंच्युरी झळकवली. त्याचा हा 100 वा कसोटी सामना होता. वॉर्नरशिवाय विकेटकीपर फलंदाज एलेक्स कॅरीने 103 धावांची शतकी खेळी केली. एमसीजीवर बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शतक झळकवणारा पहिला ऑस्ट्रेलियन विकेटकीपर आहे. 2013 नंतर कसोटीमध्ये शतक झळकवणारा पहिला ऑस्ट्रेलियन विकेटकीपर आहे.
ऑस्ट्रेलियाचा वनवास संपला
ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या सरस कामगिरीचा दबाव दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर दिसून आला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 396 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्याडावात दक्षिण आफ्रिकेची टीम 204 रन्सवर ऑलआऊट झाली. 16 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकलीय.