सिडनी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची मोठ्या स्कोरच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यात त्यांच्या फलंदाजांचा महत्त्वाचा रोल आहे. उस्मान ख्वाजाने शानदार खेळ दाखवला. त्याने शतक ठोकलय. उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानात झालाय. या ऑस्ट्रेलियन बॅट्समनने सिडनी टेस्टच्या दुसऱ्यादिवशी 206 चेंडूंवर शतक पूर्ण केलं. या शतकामुळे ऑस्ट्रेलियाची बाजू भक्कम झालीय. शतकानंतर उस्मान ख्वाजाने आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं.
दोन शतकी भागीदाऱ्या
उस्माम ख्वाजाने हे शतक झळकवताना दोन शतकी भागीदाऱ्या केल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी त्याने या शतकी भागीदाऱ्या केल्या. मार्नस लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 261 चेंडूत 135 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथ सोबत शतकी भागीदारी केली.
Three tons in a row in Sydney! ?
Usman Khawaja rules the SCG! #OhWhatAFeeling#AUSvSA | @Toyota_Aus pic.twitter.com/TOdzk8SrXh
— cricket.com.au (@cricketcomau) January 5, 2023
SCG वर शतकाची हॅट्रिक
उस्मान ख्वाजाने सिडनी टेस्टच्या दुसऱ्यादिवशी दुसऱ्या सेशनमध्ये शतक झळकावलं. त्याच्या कसोटी करिअरमधील हे 13 व शतक आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात त्याच्या बॅटमधून निघालेलं हे सलग तिसर शतक आहे. SCG वर ख्वाजाने आपल्या पत्नी-मुलांसमोर हे शतक झळकावलं. मैदानावर डान्स करुन त्याने या शतकाच सेलिब्रेशन केलं. उस्मान ख्वाजाने दोन धावा करुन हे शतक झळकावलं.
शतकानंतर ख्वाजाच आक्रमण
शतक झळकवल्यानंतरही उस्मान ख्वाजाच दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर आक्रमण कायम आहे. ऑस्ट्रेलियाला जी सुरुवात अपेक्षित होती, तशी सुरुवात त्यांना मिळाली.