मुंबई: T20 क्रिकेट हा फलंदाजांचा फॉर्मेट समजला जातो. इथे चौकार-षटकारांचा पाऊस पहायला मिळतो. T20 क्रिकेटमध्ये काहीवेळा आश्चर्यकारक फटके पहायला मिळतात. टी 20 क्रिकेटमध्ये काही शॉट्स हे फलंदाजांची ओळख आहेत. क्रिकेटमध्ये काही पांरपारिक फटके आहेत. त्यापेक्षा वेगळे शॉट्स टी 20 मध्ये पहायला मिळतात.
सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 सीरीज सुरु आहे. दोन्ही टीम्समध्ये सामना झाला. त्यावेळी विंडिजच्या काइल मायर्सने एक सुंदर फटका खेळला. आज क्रिकेट जगतात त्याच शॉटची चर्चा आहे.
मायर्सच्या सिक्सने सगळ्यांचच मन जिंकलं
क्वीन्सलँडच्या ओव्हल मैदानात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियात सीरीजमधला पहिला टी 20 सामना झाला. मॅचमधली चौथी ओव्हर सुरु होती. चेंडू ग्रीनच्या हातात होता. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मायर्सने खडे-खडे जबरदस्त सिक्स मारला. त्याची क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे.
सर्वचजण हैराण
मायर्सने कव्हरमध्ये शानदार सिक्स मारला. 105 मीटर लांबलचक मारलेला हा षटकार पाहून सर्वचजण हैराण होते. सर्वांनाच मायर्सच्या या शॉटच कौतुक वाटलं. टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने सुद्धा त्याच्या टि्वटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेयर केलाय. मायर्सच त्याने कौतुक केलय.
WOW!
Incredible six from Mayers – over cover! #AUSvWI pic.twitter.com/xBEaPYgFzN
— cricket.com.au (@cricketcomau) October 5, 2022
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोण जिंकलं?
मायर्सने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याने त्याच्या इनिंगमध्ये पाच चौकार आणि एक षटकार लगावला. मायर्स 10 व्या ओव्हरमध्ये कमिन्सच्या चेंडूवर बोल्ड झाला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी नऊ विकेट गमावून 145 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 146 धावांचे लक्ष्य एक चेंडू राखून पार केलं.