मुंबई: ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आणि भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. टीम मध्ये 15 खेळाडूंना स्थान दिलं आहे. एरॉन फिंचकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलय. ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर (IND vs AUS) येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये टी 20 वर्ल्ड कप आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या आणि टी 20 वर्ल्ड कप टीम मध्ये ऑस्ट्रेलियाने फक्त एक बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नरची (David Warner) भारत दौऱ्यासाठीच्या संघात निवड केलेली नाही. वॉर्नर भारत दौऱ्यावर येणार नाहीय. त्याच्याजागी कॅमरुन ग्रीनची निवड केली आहे. मागच्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपसाठी जो संघ निवडला होता, आताचा संघही बहुतांश तसाच आहे. फक्त लेग स्पिनर मिचेल स्वेपसनच्या जागी टिम डेविडचा संघात समावेश केला आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2O22 साठी निवडलेली ही टीम सप्टेंबर मध्ये भारत दौऱ्यावर येईल. भारत दौऱ्यासाठी डेविड वॉर्नरला आराम देण्यात आला आहे. त्याच्याजागी कॅमरुन ग्रीनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर तीन T20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. ही सीरीज ऑस्ट्रेलियाच्या टी 20 वर्ल्ड कप मोहिमेचा भाग आहे. 20, 23 आणि 25 सप्टेंबरला मोहाली, नागपूर आणि हैदराबाद मध्ये हे सामने होणार आहेत.
टी 20 वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाच अभियान 22 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. गत विजेता ऑस्ट्रेलियन संघ विजेतेपद कायम टिकवण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियासाठी चांगली बाब म्हणजे हा टी 20 वर्ल्ड कप त्यांच्याच देशात होत आहे.
A big few months ahead for this group.
✈️ India for a three-match T20I series
? @T20WorldCup on home soil pic.twitter.com/e2fAOnIT9m— cricket.com.au (@cricketcomau) August 31, 2022
ऑस्ट्रेलियाची टी20 वर्ल्ड कप टीम: एरॉन फिंच (कॅप्टन), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), टिम डेविड, एस्टन एगर, जोश हेजलवुड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिश, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जंपा