मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघ मागील कित्येक वर्ष अनेक अडचणींचा सामना करत आहे. देशातील दहशतवादाच्या मुद्द्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला हाल सोसावे लागतात. 2009 साली लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय संघानी पाकिस्तानचा दौरा करणं सोडून दिलं. पण मागील काही वर्षांमध्ये यात बदल होत असून काही संघ पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. यान्वयेच तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. 2022 च्या मार्चमध्ये हा दौरा होणार असून नुकतंच याचं वेळापत्रकही समोर आलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) ट्विटरवरुन दौऱ्याची संपूर्ण माहिती दिली आहे. या दौऱ्यामध्ये प्रत्येकी 3 कसोटी आणि एकदिवसीय सामने असून एक टी20 सामना खेळवला जाणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील महिन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघानी त्यांचे पाकिस्तानचे दौरे अचानक रद्द केले होते. न्यूझीलंडचा संघ तर पाकमध्ये पोहचून सामन्याच्या काही तास आधी सुरक्षेच्या कारणावरुन माघारी परतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघही नक्की दौऱ्यावर येईल का? हे अजून सांगता येणार नाही, पण तूर्तास वेळापत्रक तरी समोर आले आहे.
Just in ?️
All the details of @CricketAus‘ first tour of Pakistan in two decades ?https://t.co/HvKJ2uXUlF
— ICC (@ICC) November 8, 2021
कसोटी सामने
3 ते 7 मार्च – पहिला कसोटी सामना, कराची
12 ते 16 मार्च – दुसरा कसोटी सामना, रावळपिंडी
21 ते 25 मार्च – तिसरा कसोटी सामना, लाहोर
एकदिवसीय सामने
29 मार्च – पहिला एकदिवसीय सामना, लाहोर
31 मार्च – दुसरा एकदिवसीय सामना, लाहोर
2 एप्रिल– तिसरा एकदिवसीय सामना, लाहोर
टी20 सामना
5 एप्रिल– एकमेव टी20 सामना, लाहोर
इतर बातम्या
मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा
(Australia Cricket team will go to Pakistan tour after 24 years in march 2022)