मेलबर्न: अॅडलेड ओव्हल मैदानावर (Adelaide Oval) सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील (Ashes series) दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आज ड्रेसिंग रुममध्ये एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. ड्रेसिंग रुममध्ये जे घडलं, त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आज कसोटी सामन्याचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना अन्य खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये बसून चर्चा करत होते.
सलामीवीर डेविड वॉर्नरच्या शेजारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कोच जस्टिन लँगर बसले होते. या दरम्यान खुर्चीवर बसलेल्या वॉर्नरला शिंका आली. ही शिंका इतकी जोरदार होती की, वॉर्नर खुर्चीवरुन कोसळला. त्यावेळी शेजारी बसलेला स्मिथ आणि लँगरही दचकले. वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान डेविड वॉर्नरचं अॅशेस मालिकेत दमदार प्रदर्शन सुरु आहे. आतापर्यंत दोन वेळा वॉर्नर नर्वस नाईंटीमध्ये आऊट झाला आहे.
Rib soreness + sneezing = scenes.
Poor David Warner ?? #Ashes pic.twitter.com/nfjE6g38hv
— 7Cricket (@7Cricket) December 19, 2021
दोन्ही कसोटीमध्ये वॉर्नरचं शतकं अगदी थोडक्यात हुकलं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात वॉर्नर काल १३ धावांवर रनआऊट झाला. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 230 धावांवर घोषित केला. इंग्लंडचा संघ फलंदाजीला मैदानावर उतरला असून त्यांना विजयासाठी 400 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडच्या दोन विकेट गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची पावलं हळूहळू विजयाच्या दिशेने जात असून उद्या कसोटीचा शेवटचा दिवस आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर अॅशेस मालिकेतील दुसरा डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे.
संबंधित बातम्या:
स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास….
‘भारतीयही बोलतील, आमच्याकडे बाबर-रिझवान सारखे खेळाडू नाहीत’, पाकच्या माजी क्रिकेटपटूने उधळली मुक्ताफळं
Ind vs SA: केएल राहुल उपकर्णधार झाल्याने मुंबईकर अजिंक्य रहाणेचं संघातील स्थान धोक्यात? 26 डिसेंबरला काय होणार?