IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 9 विकेटने हरवलं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने आपलं खात उघडलय. चार कसोटी सामन्यांच्या या सीरीजमध्ये टीम इंडिया पराभवानंतरही 2-1 ने आघाडीवर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडेच रहाणार आहे. मात्र इंदोर कसोटी गमावल्यामुळे WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा प्रवेश अडचणीत सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने इंदोरमध्ये बाजी मारली व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
भारताला WTC च्या फायनलमध्ये प्रवेशासाठी आता चौथ्या कसोटीची वाट पहावी लागणार आहे. सीरीजचा चौथा कसोटी सामना टीम इंडियासाठी आयसीसीच्या सेमीफायनलसारखा असेल.
चौथा कसोटी सामना कधी?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून खेळला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला काहीही करुन हा कसोटी सामना जिंकावाच लागेल.
#WTC23 Final bound ?
Congratulations Australia. See you in June! ? pic.twitter.com/H2YdaWPzYV
— ICC (@ICC) March 3, 2023
फायनलच्या शर्यतीत भारतासोबत कुठली टीम?
टीम इंडियाला चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही, तर त्यांना नशिबावर अवलंबून रहाव लागेल. फायनलच्या शर्यतीत टीम इंडिया बरोबर श्रीलंकेची टीम सुद्धा आहे. अहमदाबादचा कसोटी सामना ड्रॉ राहिला, तरी टीम इंडियाच्या अडचणी वाढतील. त्याचवेळी श्रीलंकेसाठी फायनलचे दरवाजे उघडू शकतात.
न्यूझीलंड विरुद्ध 2 टेस्ट मॅच
श्रीलंका या महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. त्यांनी किवी टीमला क्लीन स्वीप केलं, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची श्रीलंकेची शक्यता वाढेल. 68.52 पॉइंटसह ऑस्ट्रेलियाची टीम टॉपवर आहे. त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत 60.29 पॉइंटसह दुसऱ्या आणि श्रीलंका 55.33 पॉइंटसह तिसऱ्या स्थानावर आहे.