IND vs AUS Test : सध्या ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आहे. चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला आहे. ऑस्ट्रेलियन टीम भारतात असताना, त्यांच्या T20 टीमच्या कॅप्टनने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या T20 टीमचा कॅप्टन एरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती जाहीर केली आहे. टेस्ट आणि वनडेमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली होती. आता त्याने T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाला T20 टीमसाठी नव्या कॅप्टनची निवड करावी लागणार आहे. एरॉन फिंचने मागच्यावर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी तो टी 20 क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती घेईल, असा अंदाज होता.
बिग बॅश लीगनंतर भविष्याबद्दल निर्णय घेईन, असं त्याने सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग संपल्यानंतर त्याने आता निवृत्तीची घोषणा केलीय. फिंचने आपल्या करिअरमध्ये 5 टेस्ट, 146 वनडे आणि 103 T20 सामने खेळले.
फिंचच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया चॅम्पियन
मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी एरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली. दुखापतीमुळे तो टुर्नामेंटमधील अफगाणिस्तान विरुद्ध शेवटचा सामना खेळू शकला नव्हता. भले फिंचच नेतृत्व मागच्या वर्ल्ड कपमध्ये कमी पडलं असेल, पण त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियन टीमने चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता.
Our World Cup winning, longest serving men’s T20I captain has called time on a remarkable career.
Thanks for everything @AaronFinch5 ? pic.twitter.com/cVdeJQmCXN
— Cricket Australia (@CricketAus) February 6, 2023
T20I मध्ये 172 धावा ठोकून रेकॉर्ड
फिंचने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण 254 सामने खेळले. यात 19 शतकासोबत एकूण 8,804 धावा केल्या. क्रिकेटच्या सर्वात छोट्या T20 फॉर्मेटमध्ये तो सर्वाधिक इंटरनॅशनल क्रिकेट खेळला. 2018 साली झिम्बाब्वे विरुद्ध त्याने फक्त 76 चेंडूत 172 धावा ठोकल्या होत्या.
त्याच्या आयुष्यातील 2 खास क्षण
फिंचने निवृत्ती जाहीर करताना फॅमिली, टीममधील सहकारी, सपोर्ट स्टाफ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले आहेत. त्याने 2021 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकणं आणि 2015 साली ऑस्ट्रेलियात वनडे वर्ल्ड कप जिंकण हा करिअरमधला सर्वोत्तम क्षण असल्याचं सांगितलं.