मेलबर्न: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्यादिवशी डेविड वॉर्नरने शानदार डबल सेंच्युरी झळकवली. त्याच्या डबल सेंच्युरीवर स्टेडियममध्ये टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. आनंदाच्या या क्षणात वॉर्नरची पत्नी कँडिसच्या डोळ्यात अश्रू होते. ती प्रचंड भावनिक झाली होती. मागच्या काही काळापासून वॉर्नरची खराब वेळ सुरु आहे. त्याची बॅट चालत नव्हती. त्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियात त्याच्याविरोधात गेलं.
त्यांच्यासाठी ही जोरदार चपराक
डेविड वॉर्नरला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला. वॉर्नरवरील हा दबाव त्याच्या पत्नीला समजत होता. त्याच दरम्यान वॉर्नरने आपल्या आक्रमक स्टाइलमध्ये आज डबल सेंच्युरी झळकवली. 1089 दिवसानंतर वॉर्नरच्या बॅटमधून सेंच्युरी निघाली. वॉर्नर कुटुंबासाठी हे शतक खास आहे. कारण जे डेविडला निवृत्तीचा सल्ला देत होते, त्यांच्यासाठी ही जोरदार चपराक आहे.
Don’t ever write this man off! David Warner brings up 100 in his 100th Test. What a moment! A brilliant innings thus far. ? #AUSvSA @davidwarner31 pic.twitter.com/uzpvWOfZjr
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) December 27, 2022
डोळ्यात आनंदश्रू तरळले
वॉर्नरला सूर गवसल्याच पाहून प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या कँडिसच्या डोळ्यात आनंदश्रू तरळले. वॉर्नरही यावेळी भावूक झाला होता. त्याने डबल सेंच्युरीनंतर पत्नीला फ्लाइंग किस दिलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 साली सँडपेपर वादात तो फसला होता. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्याला कधीच ऑस्ट्रेलियाच नेतृत्व करता येणार नाही. कारण वॉर्नरच्या कॅप्टनशिपवर आजीवन बंदी घालण्यात आली.
डेविड वॉर्नरने काय आरोप केला?
वॉर्नरच्या नेतृत्व करण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. या निर्णयाविरोधात त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अपील केलं होतं. पॅननला सर्वांसमक्ष माझा अनादर करायचा आहे, असं सांगून वॉर्नरने त्याचं अपील मागे घेतलं. त्याच्या कुटुंबाने बरच काही सहन केलय. वॉर्नरच्या या वक्तव्यानंतर त्याच्यात आणि बोर्डात सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं. त्यात त्याची बॅट चालत नव्हती, त्यामुळे क्रिकेट सोडण्याचा दबाव त्याच्यावर वाढत चालला होता.