मेलबर्न: सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बॉक्सिंग डे टेस्ट सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कमालीच प्रदर्शन केलं. 3 वर्षानंतर तो अशी लाजवाब इनिंग खेळला. सर्वांनीच वॉर्नरच्या या खेळीच कौतुक केलं. वॉर्नरने त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यात तितकीच शानदार कामगिरी केली. त्याने या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकवली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नरने 254 चेंडूत डबल सेंच्युरी झळकवली. त्यानंतर तो आपली इनिंग पुढे नेऊ शकला नाही. रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे मैदानाबाहेर जावं लागलं.
त्याला भान राहिलं नाही
77 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वॉर्नरने बाऊंड्री मारली. एनगिडी ही ओव्हर टाकत होता. त्याने या चौकारासह 200 धावा पूर्ण केल्या. चेंडूने बाऊंड्री लाइनला स्पर्श करताच, वॉर्नर जोशमध्ये आला. त्याने जोरदार सेलिब्रेशन केलं. या जोशमध्ये त्याला भान राहिलं नाही.
What a moment for David Warner – a double hundred in his 100th Test!
The celebration says it all. pic.twitter.com/TDwar24VML
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 27, 2022
हवेत उडी मारली, आणि….
डेविड वॉर्नर डबल सेंच्युरीच्या जवळ होता, त्यावेळी क्रॅम्पमुळे त्याला चालण्यात अडचणी येत होत्या. डबल सेंच्युरीच्या आनंदात तो ही गोष्ट विसरुन गेला. त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं. त्याने ब्रेकही घेतला होता. तरीही, त्याने फलंदाजी सुरु ठेवली. 200 रन्स पूर्ण होताच, जोशमध्ये त्याने हवेत उडी मारली. या हाय जोशच्या नादात त्याचं पायाच दुखणं वाढलं.
दोन खांद्यांचा आधार लागला
वॉर्नरच दुखण इतकं वाढलं की, तो धड चालूही शकत नव्हता. त्याला मैदानाबाहेर येण्यासाठी दोघांच्या खांद्याचा आधार घ्यावा लागला. वॉर्नर रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन त्याच्याजागी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. वॉर्नरने आपल्या इनिंगमध्ये 16 चौकार आणि 2 षटकार लगावले. करिअरमधील 100 व्या टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकवणारा डेविड वॉर्नर पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरलाय. इंग्लंडच्या जो रुटने 2021 मध्ये ही कमाल केली होती.