AUS vs SA: जितका जोरदार शॉट, तितकीच जबरदस्त कॅच, 3 सेकंदात संपला खेळ, VIDEO

| Updated on: Dec 26, 2022 | 12:01 PM

AUS vs SA: कॅच पाहून तुमच्या तोंडूनही कौतुकाचे शब्द बाहेर पडतील.

AUS vs SA: जितका जोरदार शॉट, तितकीच जबरदस्त कॅच, 3 सेकंदात संपला खेळ, VIDEO
AUS vs SA
Image Credit source: Screengrab
Follow us on

मेलबर्न: क्रिकेटच्या मैदानात एकापेक्षाएक सरस कॅच पकडल्या जातात. या कॅच पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बॉक्सिंग डे टेस्ट सुरु आहे. या कसोटीत एक जबरदस्त कॅच पहायला मिळाली. या कॅचने 3 सेकंदात बॅट्समनचा खेळ संपवला. बॅट्समन खराब फटका खेळला नव्हता. त्याने कव्हर्सच्या दिशेने जोरदार शॉट मारला होता. पण तिथे उभ्या असलेल्या फिल्डरने तितकीच कमालीची कॅच पकडली. या फिल्डरच कराव तेवढं कौतुक कमी आहे.

कोणी पकडली कॅच?

मार्नस लाबुशेनने ही कॅच पकडली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज खाया जोंडोने कव्हर्सच्या दिशेने शॉट मारला होता. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला होता. लाबुशेन ही कॅच घेतली नसती, तर चेंडू थेट सीमारेषेपार गेला असता. पण असं झालं नाही.

डाइव्ह मारली, 3 सेकंदात संपला खेळ

जोंडोने फटका खेळल्यानंतर चेंडू गोळीसारखा वेगात होता. त्यावेळी लाबुशेनने डाइव्ह मारुन कॅच घेतली. ज्यांनी कोणी हा झेल पाहिला, ते हैराण झाले. पाहताना ही कॅच सोपी वाटते, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. लाबुशेनने अत्यंत सुंदररित्या ही कॅच पकडली. फक्त 3 सेकंदात बॅट्सनचा खेळ संपला.

खाया जोंडोने किती धावा केल्या?

खाया जोंडोने 19 चेंडूत 5 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावातील हा पाचवा विकेट होता. लाबुशेनच्या कॅचमुळे मिचेल स्टार्कला दुसरी विकेट मिळाली. लाबुशेनने ही कॅच पकडण्याआधी डीन एल्गर रनआऊट केलं. ऑस्ट्रेलियान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावात आटोपला, दक्षिण आफ्रिकेकडून मार्के जॅनसनने सर्वाधिक 59 धावा केल्या. कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक 5, मिचेल स्टार्कने 2, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.