IND vs AUS Test Series : भारत-ऑस्ट्रेलियामधील टेस्ट सीरीजची दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना नेहमीच उत्सुक्ता असते. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम मागच्या 18 वर्षांपासून भारतात कसोटी मालिका जिंकू शकलेली नाही. आता टेस्ट सीरीज सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या अडचणीच वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एका स्टार खेळाडूला भारत दौऱ्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. कोण आहे तो प्लेयर? जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज उस्मान ख्वाजाने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक मीम फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिलं. मी माझ्या भारतीय व्हिसाची वाट पाहतोय. #dontleaveme #standard #anytimenow हे हॅशटॅगही त्याने दिलेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय सांगितलं?
ऑस्ट्रेलियाचे बहुतांश खेळाडू मंगळवारी रात्री एलन बॉर्डर मेडल समारंभात सहभागी झाले. तिथून ते सिडनीला रवाना झाले. ख्वाजाचा व्हिसा लवकरच क्लियर होईल आणि गुरुवारी तो भारताकडे रवाना होईल, अशी अपेक्षा असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वाइल्ड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सला सांगितलं.
पाकिस्तानात झाला जन्म
36 वर्षाच्या उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झाला. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाला. न्यू साऊथ वेल्सकडून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आपल्या शानदार प्रदर्शनामुळे त्याला ऑस्ट्रेलियन टीममध्ये स्थान मिळालं.
स्फोटक फलंदाजीत माहीर
उस्मान ख्वाजा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही काळापासून तो दमदार प्रदर्शन करतोय. त्याने आपल्या खेळाने सर्वांचच मन जिंकलय. ऑस्ट्रेलियासाठी 56 कसोटी सामन्यात 4162 धावा केल्या आहेत. यात 13 शतकं आहेत. 40 वनडे सामन्यात 1554 धावा केल्या आहेत. 9 T20 सामन्यात 241 धावा केल्यात.