डरबन : आशिया कप 2023 मध्ये येत्या 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. या मॅचवर सगळ्यांच्या नजरा आहेत. पण या महत्वाच्या सामन्याआधी पाकिस्तानला एक झटका बसला आहे. पाकिस्तानसाठी चांगली बातमी नाहीय. पाकिस्तानी टीम वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली होती. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळासाठी ठरला. अवघ्या 9 दिवसात पाकिस्तानी टीमकडून हा मान हिरावला गेला. पाकिस्तानने वनडे रँकिंगमधल आपलं नंबर 1 स्थान गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवलं. या विजयासह ऑस्ट्रेलियन टीम नंबर 1 स्थानावर पोहोचली. ऑस्ट्रेलियाने ही मॅच तीन विकेटने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांचा डाव 222 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 40.2 ओव्हरमध्ये विजली लक्ष्य गाठलं. नऊ दिवसापूर्वीच पाकिस्तानी टीम वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 स्थानावर पोहोचली होती. पण काही दिवसातच त्यांना हे स्थान गमवाव लागलं. पाकिस्तानकडे अजूनही संधी आहे. वनडेमध्ये ते पुन्हा एकदा गमावलेला मान मिळवू शकतात. पाकिस्तानी टीम आपला पुढचा सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानने भारताला हरवलं, तर ते पुन्हा वनडेमध्ये रँकिंगमध्ये नंबर 1 बनतील. ऑस्ट्रेलियाला हा विजय सहज मिळाला नाही. त्यांनी 113 रन्सवर सात विकेट गमावले होते. कॅमरुन ग्रीनला सहाव्या ओव्हरमध्ये दुखापत झाली.
लाबुशेनचा जबरदस्त खेळ
ग्रीनला कगिसो रबाडाचा चेंडू लागला. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. लाबुशेनने एश्टन एगर सोबत मिळून कठीण परिस्थितीत टीमचा डाव सावरला. दोघांनी 8 व्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली व टीमला विजय मिळवून दिला. एगर 48 धावांवर नाबाद राहिला. लाबुशेनने आपल्या इनिंगमध्ये 93 चेंडूंचा सामना करताना आठ चौकार मारत 80 धावा केल्या. एगरने 69 चेंडूंता सामना करताना तीन चौकार आणि एक सिक्स मारला.
बावुमाची बॅट चालली
याआधी दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुद्धा विशेष नव्हती. कॅप्टन बावुमाने बॅटिंग केली नसती, तर दक्षिण आफ्रिकेची टीम 222 धावांपर्यंत सुद्धा पोहोचली नसती. सलामीवीर बावुमाने सुरुवातीपासून खेळपट्टिवर टिकून फलंदाजी केली. त्याने 142 चेंडूंचा सामना करताना 14 फोर, 1 सिक्स मारला. त्याने 114 धावा केल्या.