बिग बॅशच्या पुढच्या सीजनसाठी एडिलेड स्ट्रायकर्सने आपल्या नव्या हेड कोचची घोषणा केली आहे. कोच पदासाठी टिम पेनची निवड केली आहे. टिम पेनवर मुलीला अश्लील, घाणेरडे फोटो पाठवण्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच कर्णधारपद सोडाव लागलं होतं. हे प्रकरण 2017 सालच आहे. प्रोफेशनल क्रिकेट करियरला गुड बाय केल्यानंतर 3 वर्षात पेन बिग बॅश लीगमध्ये कोचिंग करताना दिसणार आहे. एडिलेड स्ट्रायकर्समध्ये टिम पेन कोच म्हणून जेसन गिलेस्पीची जागा घेणार आहे.
जेसन गिलेस्पी आता पाकिस्तान टेस्ट टीमचा कोच आहे. गिलेस्पी पाकिस्तानच्या कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारल्याने एडिलेड स्ट्रायकर्समध्ये कोच पदाची जागा रिक्त झाली होती, ज्याची भरपाई टिम पेनच्या रुपात केली आहे. टिम पेन आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2021 साली ब्रिसबेनमध्ये खेळलेला.
टिम पेनने चुकी मान्य केलेली का?
भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर टिम पेनने आपल्या प्रोफेशनल क्रिकेट करियरला अलविदा म्हटलेलं. वर्ष 2017 मध्ये महिला सहकाऱ्याला घाणेरडे फोटो पाठवण्याचा टिम पेनवर आरोप आहे. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच कर्णधारपद सोडलं होतं. टिम पेनने आपली चुकी मान्य करत शिक्षा सुद्धा मागितलेली.
त्याने पत्नी आणि कुटुंबाला सांगितलेलं
त्यावेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये पेनने म्हटलेलं की, 4 वर्षांपूर्वी महिला सहकाऱ्याला टेक्स्ट मेसेज पाठवले होते. त्यासाठी माफी मागितलेली. आजही माफी मागतो. आपल्या चुकीबद्दल त्याने पत्नी आणि कुटुंबाला सांगितलेलं. त्यांनी सुद्धा माफ केलेलं. टिम पेन ऑस्ट्रेलियाच कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचा भाग होता.
दोघांकडे जबाबदाऱ्या
आता टिम पेनसमोर एडिलेड स्ट्रायकर्सकडून बेस्ट कामगिरी करुन घेण्याचं आव्हान आहे. तिथे जेसन गिलेस्पीकडे पाकिस्तानी संघाकडून बेस्ट कामगिरी करुन घेण्याची जबाबदारी असेल. पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये टेस्ट सीरीज 21 ऑगस्टपासून होणार आहे. जेसन गिलेस्पीची हेड कोच म्हणून पहिली असाइनमेंट असेल.