मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले गेले. ज्यामध्ये भारतीय महिलांनी मालिका 2-1 च्या फरकाने गमावली. आता या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्याला गुरुवारपासून (30 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान हा सामना पार पडणार आहे.
भारतासाठी ही एक ऐतिहासिक टेस्ट मॅच असेल. कारण भारतीय महिला प्रथमच डे-नाइट टेस्ट मॅच खेळणार असून ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तब्बल 15 वर्षानंतर कसोची सामना खेळणार आहेत. याआधी दोन्ही संघानी 2006 मध्ये एडिलेड येथे टेस्ट मॅच खेळली होती. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला होता. याआधी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. यावेळी सात वर्षानंतर भारतीय महिला कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना गुरुवारी, 30 सप्टेंबर कॅरारा ओव्हल या क्वीन्सलँड येथीली मैदानावर खेळवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरु होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर थेट प्रसारित होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SonyLiv वर असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाली. भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने गमावली खरी पण सर्वच भारतीय महिलांनी उत्तम खेळीचे दर्शन यावेळी घडवलें. पहिला सामना 9 विकेट्सने गमावल्यावर दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिलांना 5 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. पण अखेरच्या सामन्यात 2 विकेट्सने भारताने विजय मिळवला. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियन संघाचा सलग 26 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विजयी रथही भारताने थांबवला.
हे ही वाचा
ICC Women ODI Rankings: मिताली राजची रँकिंग घसरली, गोलंदाज झुलन गोस्वामीला मात्र मोठा फायदा
(AUSW vs INDW, 1st Test live Streaming When And Where To watch online to free in marathi)