Axar Patel Engagement : टीम इंडियाच्या ‘बापूं’नी वाढदिवशी केला साखरपुडा

| Updated on: Jan 21, 2022 | 11:41 AM

टीम इंडियाचा लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलने 20 जानेवारीला त्याचा 28 वा वाढदिवस साजरा केला. हा दिवस अधिक खास बनवत अक्षरने त्याच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा केला. अक्षर पटेलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना याबाबतची माहिती दिली.

Axar Patel Engagement : टीम इंडियाच्या बापूंनी वाढदिवशी केला साखरपुडा
Axar Patel Engagement
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलने 20 जानेवारीला त्याचा 28 वा वाढदिवस साजरा केला. हा दिवस अधिक खास बनवत अक्षरने त्याच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा केला. अक्षर पटेलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना याबाबतची माहिती दिली. अक्षर पटेलच्या एंगेजमेंटची बातमी समोर येताच, त्याचे टीममेट आणि टीम इंडियाचे चाहते अक्षरचे अभिनंदन करत आहेत. अक्षर पटेल सध्या भारतीय वनडे संघाबाहेर आहे.

2021 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले, ‘आज आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे, आजपासून नेहमी एकत्र. तुझ्यावर कायम प्रेम.’ अक्षर पटेलने सोशल मीडियावर काही फोटोदेखील शेअर केले आहेत ज्यात तो त्याची होणारी बायको मेहासोबत दिसत आहे.

टीम इंडियाच्या सहकाऱ्यांमध्ये ‘बापू’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अक्षरने त्याच्या मैत्रिणीला अतिशय संस्मरणीय पद्धतीने लग्नाचा प्रस्ताव दिला. अक्षरने त्याचा वाढदिवस हा खास दिवस म्हणून निवडला आणि त्याच दिवशी आपल्या मैत्रिणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. साखरपुड्याच्या ठिकाणी असलेला ‘Marry Me’ चा बोर्ड याकडे बोट दाखवत आहे.

पंत आणि सूर्यकुमारकडून मजेशीर पद्धतीने अक्षरचे अभिनंदन

अक्षरने फोटो शेअर केल्यानंतर, टीम इंडियातील सदस्यांकडून अक्षर पटेलला अभिनंदनाचे संदेश येऊ लागले आहेत. टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने मजेशीर पद्धतीने अक्षरचे अभिनंदन केले. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने अक्षरच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट केली आहे, ‘Congratulations my theplas’, तर सूर्यकुमार यादवने कमेंटमध्ये म्हटलंय की, ‘Baaapu khel Gaya bhai, aaj ka din yaad rahega ache se’.

अक्षरची आंतराष्ट्रीय कसोटी कारकीर्द

2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलसाठी गत वर्ष संस्मरणीय ठरले. अक्षर पटेलने 5 कसोटी खेळल्या ज्यात 36 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. या 5 कसोटी सामन्यांमध्ये अक्षरने 5 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आणि एका कसोटीत एकदा 10 हून अधिक बळी घेतले. त्याचबरोबर अक्षरची फलंदाजीही चांगली होती. 5 कसोटी सामन्यांच्या 8 डावात अक्षरने 29.83 च्या सरासरीने 179 धावा केल्या, ज्यात अर्धशतकांचा समावेश आहे.

इतर बातम्या

IND vs SA 2nd ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना

Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय

(Axar Patel celebrates 28th birthday with engagement with girlfriend Meha)