मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मधला दुसरा वनडे सामना क्रिकेट रसिक सहजासहजी विसरणार नाहीत. अक्षर पटेलने (Axar patel) त्या सामन्याचा शेवट खूप सुंदर केला. षटकाराने त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अक्षर पटेलने त्या मॅच मध्ये ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं. त्याच्या इनिगने भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) प्रभावित झाला. रोहितने अक्षर पटेलची बॅटिंग पाहून चक्क गुजराती मध्ये त्याला टि्वटरवर शुभेच्छा दिल्या. रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे, त्याशिवाय तो मुंबईकर आहे. रोहितला तुम्ही हिंदी आणि इंग्रजी मध्ये बोलताना पाहिलं असेल. अक्षर पटेलची पोर्ट ऑफ स्पेन मधली इनिंग पाहून शुभेच्छा देण्यासाठी रोहितने गुजराती भाषेची निवड केली.
अक्षर पटेल गुजराती आहे. म्हणूनच रोहितने त्याला गुजराती भाषेत शुभेच्छा दिल्या. रोहितच्या त्या मेसेजला अक्षरनेही गुजराती भाषेतच रिप्लाय दिला आहे. रोहितने म्हटलं होतं, ‘बापू बढू सारू छे’, त्यावर अक्षरने ‘बढू सरू छे रोहित भाई’ असा रिप्लाय दिलाय.
अक्षर पटेलने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्यावनडे सामन्यात ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं. एक विकेट त्याने घेतला. त्याशिवाय 34 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 5 सिक्स होते. विजयी षटकारही अक्षरनेच खेचला. या कमालीच्या इनिंगसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
Badhu saru che rohit bhai ? thanks.. cheers ? https://t.co/tzxRzLXy4L
— Akshar Patel (@akshar2026) July 25, 2022
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे सामन्यात टीम इंडिया 2-0 ने विजयी आघाडीवर आहे. पहिल्या वनडेत 3 धावांनी निसटता विजय मिळवला होता. शेवटच्या षटकात 15 धावांचा बचाव केला होता. दुसरी वनडे 2 विकेट आणि 2 चेंडू राखून जिंकली. दुसऱ्या वनडेत भारताने अखेरच्या षटकात विजयासाठी 8 धावा फटकावल्या होत्या. आता तिसरा वनडे सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. शेवटचा सामना जिंकून प्रतिष्ठा वाचवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल.