लंडन : IPL इतकीच इंग्लंडमध्ये होणारी ‘द हंड्रेड’ टुर्नामेंट लोकप्रिय आहे. दोन यशस्वी सीजननंतर ‘द हंड्रेड’ स्पर्धेचा तिसरा सीजन येणार आहे. 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या लीगसाठी नुकतच ऑक्शन पार पडलं. आठ टीम्सनी ड्राफ्टमधील खेळाडूंवर पैसा लावून त्यांना विकत घेतलं. ते तिसऱ्या सीजनसाठी या टीम्सकडून खेळणार आहेत. या ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंना भाव मिळाला नाही. हे खेळाडू अनसोल्ड ठरले.
धक्कादायक बाब म्हणजे आठ टीम्सपैकी कोणीही पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजम आणि स्टार बॅट्समन मोहम्मद रिजवान यांच्यावर बोली लावली नाही. त्याशिवाय वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन कायरन पोलार्ड आणि आंद्र रसेलला सुद्धा खरेदीदार मिळाला नाही.
PSL मध्ये बाबर-रिजवानने किती धावा केल्या?
बाबर आजमवर कुठल्याच टीमने बोली लावली नाही, याचं अनेकांना आश्चर्य वाटतय. टी 20 फॉर्मेटमध्ये बाबर आजमचा रेकॉर्ड कमालीचा आहे. अलीकडेच पाकिस्तानात झालेल्या सुपर लीगमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या होत्या. त्याने 11 मॅचमध्ये 522 रन्स केले. तेच रिजवानने 12 सामन्यात 550 धावा फटकावल्या. त्याची सरासरी 50 पेक्षा पुढे होती.
का दोघांना खरेदी केलं नाही?
बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानला न खरेदी करण्यामागे उपलब्धता कारण असल्याच सांगितलं जातय. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तान अफगाणिस्तान विरुद्ध सीरीज खेळणार आहे. हे दोन्ही खेळाडू पूर्ण सीजन खेळणार नाहीत, यावर अनेक टीम्सना विश्वास बसत नाहीय.
मग शाहीन शाह आफ्रिदीला का विकत घेतलं?
बाबर आणि रिजवान उपलब्ध नसल्याच कारण दिलं जातय. तेच ‘द हंड्रेड’ मध्ये शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, एहसानुल्लाह खेळणार आहेत. शाहीनला वेल्श फायरने 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय. मग बाबर आणि रिजवानला का विकत घेतलं नाही? हा प्रश्न आहे. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.