लाहोर : पाकिस्तान पैशा-पैशाला तरसतोय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचं परदेशी मुद्रा भंडार रिकामी होतोय. त्यांच्याकडे कर्मचाऱ्याचे वेतन देण्या इतपतही पैसा नाहीयत. पाकिस्तानची हालत इतकी खराब आहे की, त्यांच्याकडे रेल्वे पास, डीझेल खरेदी करण्याइतपतही पैसे उरलेले नाहीत. या कठीण परिस्थितीत, पुढच्या काही दिवसात पाकिस्तान सुपर लीगच आयोजन होणार आहे. त्याच काऊंटडाऊन सुरु झालय.
5 फेब्रुवारीला मॅच
13 फेब्रुवारीला ही लीग सुरु होईल. मात्र त्याआधी पाकिस्तान टीमचा विद्यमान कॅप्टन बाबर आजम आणि माजी कर्णधार सरफराज अहमद यांच्यात सामना पहायला मिळेल. बलूचिस्तान क्रिकेट असोशिएशनने बाबर आजम इलेव्हन आणि सरफराज अहमद इलेव्हन दरम्यान 5 फेब्रुवारीला मॅच आयोजित केली आहे.
पाकिस्तानचे 2 कॅप्टन आमने-सामने
बाबर पेशावर जाल्मी आणि सरफराज क्वेटा ग्लॅडिटर्सचा कॅप्टन आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या आधी दोन्ही टीम्सममध्ये 5 फेब्रुवारीला सामना खेळला जाईल. बाबर कदाचित या सामन्याबद्दल फार उत्साहित नाहीय. पाकिस्तान लीगच्या आयोजकांना या सामन्यासाठी खूप स्वस्तात तिकीट विकावी लागतायत.
6 रुपयात विकल्या तिकीट्स
एग्जीबिशन सामन्याच्या तिकीटाची किंमत 20 पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतीय करन्सीमध्ये 6 रुपये आहे. कंगालीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला एग्जीबिशन सामन्याची 20 रुपयाची तिकीट विकत घेतालानाही विचार करावा लागतोय. आयोजकांसमोर स्टार खेळाडू खेळणार असल्याने गर्दी जमवण्याच आव्हान आहे. पाकिस्तानात सध्या गव्हाच्या पीठासाठी मारामाऱ्या सुरु आहेत. पेशावर आणि क्वेटा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या एग्जीबिशन मॅचमध्ये बाबर आजम, सरफराज अहमद यांच्याशिवाय नसीम शाह, उमर अकमल, शाहिद आफ्रिदी, वहाब रियाज, मोहम्मद हॅरिस हे स्टार खेळाडू खेळणार आहेत.