NZ vs PAK | पाकिस्तानी टीमची ऑस्ट्रेलियात वाईट अवस्था झाली. आता न्यूझीलंडमध्येही परिस्थिती बदलेली नाही. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पहिली T20 सीरीज खेळणाऱ्या पाकिस्तानी टीमचा न्यूझीलंडमध्ये पराभव झाला. पाच सामन्यांची T20 सीरीज पाकिस्तानने गमावली आहे. न्यूझीलंडने सलग तीन सामने जिंकले. त्यामुळे मालिका पाकिस्तानच्या हातून निसटली. तिसरा सामना न्यूझीलंडच्या डुनेडिनमध्ये झाला. तिथे पाकिस्तानचा 45 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या पराभवाशिवाय आणखी एक गोष्ट घडली, त्यामुळे काहीवेळासाठी फॅन्सच नाही, तर खेळाडूंच्या काळाजाचा सुद्धा ठोका चुकला. बाबर आजमच्या एका शॉटनंतर हे घडलं.
डुनेडिनमध्ये पाकिस्तानी टीम 225 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत होती. यात बाबर आजमने सर्वाधिक 58 धावा केल्या. बाबरने या मॅचमध्ये मारलेला एक सिक्स एका चाहत्यासाठी जीवघेणा ठरला असता. बाबरने पुल शॉटद्वारे हा सिक्स मारला होता. चेंडू स्क्वायर लेग बाउंड्रीच्या पार गेला. बाउंड्री रोप जवळच्या स्टँडमध्ये एक फॅन उभा होता. चेंडू सरळ त्याच्या हाताला लागला. हा चेंडू त्याच्या डोक्याला लागला असता. पण चाहत्याने हाताने स्वत:ला कसबस वाचवलं. सुदैवाने चाहत्याला गंभीर दुखापत झाली नाही.
पाकिस्तानने या T20 मध्ये किती धावा केल्या?
बाबर आजमने न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात शानदार अर्धशतक झळकवलं. पण तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. बाबरशिवाय पाकिस्तानचा दुसरा कुठलाही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सायम अय्यूने 10, फखर जमाने 19 रन्स केल्या. रिजवान 24 धावाच करु शकला. इफ्तिखारने 1 आणि आजम खानने 10 रन्स केल्या. पाकिस्तानची टीम 20 ओव्हर्समध्ये 179 धावाच करु शकली. सामन्यासह सीरीजही त्यांनी गमावली.
Babar Azam’s SIX nearly hit a spectator in the crowd. He was saved by an inch or two. Babar Azam was visibily worried about the well-being of the gentleman. pic.twitter.com/qHv35rUHJz
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) January 17, 2024
न्यूझीलंडकडून या फलंदाजाने मारल्या 16 SIX
न्यूझीलंडकडून फिन एलेनने जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून तुफानी शतक निघालं. या लेफ्टी ओपनरने 62 चेंडूत 137 धावा ठोकल्या. त्याने 16 सिक्स मारले. T20 मध्ये न्यूझीलंकडून सर्वाधिक स्कोर आणि एका सामन्यात सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज बनला.