नवी दिल्ली : यंदा क्रिकेटचा सर्वात मोठा महोत्सव भारतात होणार आहे. पहिल्यांदाच भारत स्वबळावर ICC वनडे वर्ल्ड आयोजित करणार आहे. यावेळी शेड्यूलमध्ये काही बदल झाले आहेत. भारतात नवरात्रीच्या दरम्यान वर्ल्ड कप होत आहे. वर्ल्ड कपसाठी पहिलं जे शेड्युल होतं, नवरात्रीमुळे त्यात काही बदल करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तानसह एकूण 9 सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता.
पण बदलेल्या शेड्युलमध्ये ती तारीख 14 ऑक्टोबर करण्यात आली आहे. या महामुकाबल्याआधी प्रसिद्ध गुरु बागेश्वर बाबा यांनी भविष्यवाणी केली आहे.
बागेश्वर बाबांच्या दर्शनानंतर कुलदीपच प्रदर्शन सुधारलं
बागेश्वर बाबा क्रिकेटमुळे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कुलदीप यादव त्यांच्या दर्शनासाठी पोहोचला होता. आता बागेश्वर बाबा यांचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालय. ज्यात ते, भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल टिप्पणी करताना दिसतायत. बागेश्वर बाबांच्या दर्शनानंतर वेस्ट इंडिजला पोहोचलेल्या कुलदीप यादवच प्रदर्शन आपण सर्वच बघतोय. तो प्रत्येक सामन्यात विकेट घेतोय. आपलं बेस्ट देतोय.
वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल
वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमच प्रदर्शन कसं असेल? टुर्नामेंट सुरु झाल्यानंतरच या बद्दल समजेल. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्याची भविष्यवाणी बागेश्वर बाबा यांनी आधीच केली आहे. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालय.
बाबांची भविष्यवाणी काय संकेत देतेय?
वर्ल्ड कपच पहिलं शेड्युल आलं, त्यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता. मॅच 15 ऑक्टोबरला असो किंवा 14 ऑक्टोबरला प्रश्न भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्याशी निगडित आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानपेक्षा भारताच पारडं जड आहे. नेहमीच वर्ल्ड कपचे सामने एकतर्फी झालेत. मुकाबला भारताच्या भूमीवर आहे. त्यामुळे पराजयाची शक्यता फारच कमी आहे. बाबांची भविष्यवाणी सुद्धा विजयाचे संकेत देत आहे.