ENG vs BAN : ‘हॅलो, मायकल वॉन….’ Wasim Jaffer यांनी आपल्या स्टाइलमध्ये झोडलं, ते टि्वट व्हायरल

| Updated on: Mar 15, 2023 | 1:06 PM

ENG vs BAN : गमतीने मायकल वॉनच्या जखमेवर मीठ चोळलं. जिव्हारी लागणाऱ्या टीकेवर आता वॉन काय उत्तर देणार?. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन आणि वसीम जाफर यांच्यातील टि्वटरवरील द्वंद सर्वश्रुत आहेच.

ENG vs BAN : हॅलो, मायकल वॉन.... Wasim Jaffer यांनी आपल्या स्टाइलमध्ये झोडलं, ते टि्वट व्हायरल
wasim jaffer
Image Credit source: twitter
Follow us on

ENG vs BAN T20 Series : सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून वसीम जाफर यांची चर्चा नव्हती. पण बांग्लादेशने इंग्लंडचा दारुण पराभव करताच वसीन जाफर पुन्हा Active झाले आहेत. पुन्हा त्यांचा तो गंमतीशीर अंदाज दिसून आलाय, ज्यासाठी ते ओळखले जातात. इंग्लिश टीमच्या पराभवावर फिरकी घेताना मायकल वॉनवर निशाणा साधला. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन आणि वसीम जाफर यांच्यातील टि्वटरवरील द्वंद सर्वश्रुत आहेच.

टीम इंडियाचा एखाद्या टुर्नामेंटमध्ये पराभव झाला की, मायकल वॉन लगेच टि्वट करुन खिल्ली उडवतो. टोमणे मारतो. वसीम जाफरही इंग्लंडच्या पराभवानंतर तशीच Reaction देतात. आता बांग्लादेशच्या विजयानंतर वसीम जाफर यांनी वॉनच्या टि्वटसची तशीच परतफेड केलीय.

अशी Reaction की चर्चा होणारच

बांग्लादेशने 3 T20 सामन्यांच्या सीरीजमध्ये इंग्लंडवर 3-0 ने विजय मिळवला. इंग्लिश टीमची ही अवस्था बघून वसीम जाफर यांना लगेच मायकल वॉनची आठवण झाली. त्यांनी पटकन सोशल मीडियावर रिएक्शन दिली. इंग्लंडच्या पराभवावर वसीम जाफर यांची ही Reaction च अशी होती की, त्याची चर्चा होणं स्वाभाविक होतं.


या टि्वटमध्ये एक मोठी गोष्ट आहे

वसीम जाफर यांनी आपल्या फोटोसोबत एक टि्वट पोस्ट केलय. यात इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनवर निशाणा साधलाय. सोशल मीडियावर दोघांमध्ये होणारी लढाई सगळ्यांनाच माहित आहे. इथेही असंच दिसलं. कुठे गायब आहेस? बऱ्याच दिवसापासून दिसला नाहीस असं जाफर यांनी मायकल वॉनला विचारलय. महत्त्वाच म्हणजे हे टि्वट करताना वसीम जाफर यांनी बांग्लादेशी जर्सी परिधान केलीय.

इंग्लंडने 3-0 ने गमावली सीरीज

तिसऱ्या आणि सीरीजमधील शेवटच्या टी 20 सामन्यात बांग्लादेशने पहिली बॅटिंग केली. त्यांनी इंग्लंडसमोर विजयासाठी 159 धावांच टार्गेट ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या टीमने 142 धावा केल्या, बांग्लादेशने 16 धावांनी सामन्यासह सीरीज जिंकली. 14 मार्चला हा सामना झाला.