एडिलेड: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडिया बुधवारी बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे. एडिलेडमध्ये दोन्ही टीम्स आमने-सामने येतील. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी ही मॅच महत्त्वाची आहे. जिंकण्यासाठी उद्या टीम इंडिया बांग्लादेशचे कच्चे दुवे, त्यांच्या कमकुवत बाजूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करेल.
गोलंदाजीत टीम इंडियाच कॉम्बिनेशन काय असेल?
ऑस्ट्रेलियात विकेट्सवर पेस आणि बाऊन्स दोन्ही मिळतो. हीच बांग्लादेशची सर्वात मोठी कमजोरी आहे. बांग्लादेशच्या टीमला या टुर्नामेंटमध्ये पेस आणि बाऊन्स सामना करताना अडचण आली आहे. सहाजिकच टीम इंडिया त्यांच्या या कमजोरीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. प्रश्न हाच आहे की, टीम इंडिया आपल्या प्लेइंग 11 मध्ये अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवेल का? याआधी टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाच कॉम्बिनेशन तीन स्पेशलिस्ट वेगवान बॉलर्स आणि हार्दिक पंड्या असं होतं.
पेस आणि बाऊन्सची समस्या
बांग्लादेशच्या टीमने मागच्या चार वर्षांपासून पेस आणि बाऊन्सच्या समस्येचा सामना केलाय. या टीमचा 2018 पासूनच वेगवान गोलंदाजांविरुद्ध रेकॉर्ड खराब आहे. वेगवान गोलंदाजांविरोधात मागच्या चार वर्षांपासून बांग्लादेशी फलंदाजांचा स्ट्राइक रेट खराब आहे. पेस आणि बाऊन्स त्यांच्या फलंदाजांना सहजासहजी खेळता येत नाही.
बांग्लादेशी फलंदाजांना पेसची भिती
बांग्लादेशी फलंदाजांचा पेस आणि बाऊन्स विरोधात स्ट्राइक रेट फक्त 110 आहे. कुठल्याही टीमच्या फलंदाजांचा हा सर्वात कमी स्ट्राइक रेट आहे. टीम इंडिया याचा फायदा उचलेलं. एडिलेडच्या वेगवान खेळपट्टीवर टीम इंडिया अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवणार का? हा प्रश्न आहे.