मुंबई: बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनने क्रिकेटच्या एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. हुसैनने मंगळवारी टेस्ट क्रिकेटचा निरोप घेतला. हुसैनने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिलीय. तो यापुढे टेस्ट क्रिकेट खेळणार नाही. युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, असं हुसैनच मत आहे. त्यासाठी त्याने एका फॉर्मेटमधून निवृत्ती स्वीकारलीय.
किती टेस्ट मॅच खेळलाय?
रुबेल हुसैन बांग्लादेशसाठी 27 टेस्ट मॅच खेळला आहे. यात त्याने 36 विकेट घेतल्या आहेत. रुबैल बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने 149.5 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.
किती दिवस जेलमध्ये बंद होता?
रुबैल हुसैनची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. रुबैलवर 2015 साली बलात्काराच आरोप झाला होता. त्यावेळी वर्ल्ड कपआधी अभिनेत्री नाजनीन अख्तरने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी हुसैन तीन दिवस जेलमध्ये बंद होता.
म्हणून अभिनेत्रीने तक्रार मागे घेतली
रुबैल हुसैनची वर्ल्ड कप 2015 साठी बांग्लादेशी टीममध्ये निवड झाली होती. त्यासाठी कोर्टाकडून त्याला जामीनही मिळाला. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत बांग्लादेशने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयात हुसैन हिरो ठरला होता. हुसैनची कामगिरी पाहून अभिनेत्री नाजनीन अख्तरने त्याच्याविरोधातील तक्रार मागे घेतली होती.
त्याची वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली का?
दरम्यान बांग्लादेशने 14 सप्टेंबरला T20 वर्ल्ड कपसाठी आपलं स्क्वाड जाहीर केलय. यात रुबैल हुसैनचा समावेश करण्यात आलेला नाही. टीममध्ये महमदुल्लाह सारख्या अनुभवी खेळाडूला संधी मिळालेली नाही.