सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश (Australia vs Bangladesh) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 10 क्रिकेट मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने कर्णधारपदाची धुरा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडकडे (Matthew Wade) दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार अरॉन फिंचला (Aaron Finch) वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी दुखापत झाली होती. डाव्या पायाचा घोटा दुखावल्यामुळे फिंच दौरा सोडून ऑस्ट्रेलियाला परतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅनेजमेंटने बांगलादेश दौऱ्यासाठी नव्या कर्णधाराचा शोध सुरु केला होता.
दरम्यान, फिंचच्या जागी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात अॅलेक्स कॅरीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 ने जिंकली. आता कॅरी हा बांगलादेश दौऱ्यात मॅथ्यू वेडच्या नेतृत्त्वात खेळताना दिसेल. मात्र स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांचं जेव्हा संघात पुनरागमन होईल, तेव्हा कॅरीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होईल की नाही हेच सांगता येत नाही
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित कर्णधार अरॉन फिंच हा टी 20 विश्वचषकापूर्वी फिट होईल. यूएईमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्टदरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशमधील ढाका इथल्या शेर ए बांगला स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत.
दरम्यान, विश्वचषकापूर्वी बांगलादेशात होणारी टी 20 मालिका महत्त्वाची आहे, असं मॅथ्यू वेडने सांगितलं. ढाक्यातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना स्वत:ला सिद्ध करता येईल. त्याचा फायदा यूएईमध्ये होईल, असं वेडने नमूद केलं.
मॅथ्यू वेड एश्टन एगर, वेस एगर, जेसन बेहरेनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, डॅन ख्रिश्चियन, जोश हेजलवूड, मोइसेस हेनरिक्स, मिशेल मार्श, बेन मॅकडरमोट, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, एश्टन टर्नर, एंड्रयू टाय, मॅथ्यू वेड (C), एडम झाम्पा आणि राखीव खेळाडू नाथन एलिस, तनवीर संघा
संबंधित बातम्या
भारतीय खेळाडूचा इंग्लंडविरुद्ध धमाकेदार डेब्यू, सलामीच्या सामन्यातच दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सला गवासणी