मुंबई: इंग्लंडची बर्मी आर्मी (Barmy Army) आपल्या क्रिकेटपटूंच यश साजर करण्याची एकही संधी सोडत नाही. पण हे सेलिब्रेशन करताना ते भारतीय क्रिकेटपटूंना (Indian cricketers) टार्गेट करायलाही विसरत नाहीत. आज पुण्यात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर हे पुन्हा एकदा दिसून आलं. बर्मी आर्मी हा इंग्लिश क्रिकेट संघाचं समर्थन करणारा एक ग्रुप आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना किंवा इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच्यावेळी हे बर्मी आर्मीचे समर्थक हजर असतात. सोशल मीडियावरुनही ते लढाई लढतात. आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आयपीएलचा 49 वा सामना सुरु आहे. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हा सामना होतोय.
विराट कोहली आरसीबीकडून तर मोइन अली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. मोइन अली हा इंग्लिश क्रिकेटपटू आहे. आजच्या मॅचमध्ये मोइन अलीने विराटचा विकेट घेतला, त्यावेळी बर्मी आर्मीच्या मनातील विराट बद्दलचा राग पुन्हा एकदा दिसून आला. याआधी सुद्धा त्यांनी भारताच्या या माजी कर्णधाराला लक्ष्य केलं आहे.
विराटने आज डावाची चांगली सुरुवात केली. त्याने काही चांगले फटके खेळले. पण धोनीने मोइन अलीला गोलंदाजीला आणलं. त्याने त्याच्या एक अप्रतिम चेंडूवर कोहलीच्या बेल्स उडवल्या. खरंच हा जादुई चेंडू होता. मोइन अलीने ऑफ स्टम्पच्या थोडा बाहेर चेंडू टाकला. त्याने कोहलीला ड्राइव्ह करण्याासठी निमंत्रित केलं. चेंडू कोहलीच्या बॅट मधून गेला व थेट दांड्या उडवल्या.
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) May 4, 2022
Thanks kids https://t.co/iGGUl1ugD1 pic.twitter.com/axAh81V538
— Amit Mishra (@MishiAmit) April 24, 2022
कोहली बाद झाल्यानंतर बर्मी आर्मीने लगेच विराटला टार्गेट करणारं टि्वट केलं. यात मोइन अली विराटला मागच्या खिशात ठेवतो, असा फोटो पोस्ट केला होता. याआधी सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इंग्लिश संघाने त्याला बाद केल्याचा फोटो पोस्ट केला होता. त्याला अमित मिश्राने उत्तर दिलं होतं.