Video: क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा फिल्डरने पकडली असंभव कॅच, अशा कॅचचा स्वप्नातही विचार नसेल झाला

| Updated on: Jan 02, 2023 | 6:04 PM

'या' कॅचवरुन वाद निर्माण झालेत. या कॅचल लीगल कसं ठरवता येईल, असं काही क्रिकेट तज्ज्ञांच मत आहे. तुम्ही कॅच बघा, मग तुमच्या लक्षात येईल.

Video: क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा फिल्डरने पकडली असंभव कॅच, अशा कॅचचा स्वप्नातही विचार नसेल झाला
BBL
Image Credit source: twitter
Follow us on

सिडनी: क्रिकेट मॅचमध्ये अनेकदा रोमांचक क्षण येतात. क्रिकेटच्या मैदानात काहीवेळा कल्पनेपलीकडच्या गोष्टी पहायला मिळतात. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमुळे हा रोमांच निर्माण होतो. टी 20 क्रिकेट सुरु झाल्यापासून क्रिकेटच्या खेळात काही अशक्य राहिलेलं नाहीय. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा सर्वोत्तम झेल पहायला मिळतात. बाऊंड्रीजवळ रिले किंवा जगलिंग करताना पकडलेले कॅच पाहून तुम्ही हैराण होता. ब्रिसबेन हीटचा फिल्डर मायकल नेसेरने असाच एक हैराण करुन सोडणारा झेल बिग बॅश लीगमध्ये पकडला. या कॅचमुळे मॅच पलटलीच. पण काही वादही सुरु झालेत.

डीप कव्हर्सला हवेत मारला फटका

ब्रिसबेनच्या गाबा मैदानात रविवारी 1 जानेवारीला बीबीएल 12 चा 25 वा सामना खेळला गेला. यजमान ब्रिसबेन हीट आणि सिडनी सिक्सर्सच्या टीम आमने-सामने होत्या. ब्रिसबेनने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सने 18.2 ओव्हर्समध्ये 209 धावा केल्या. शेवटच्या 10 चेंडूत 26 धावांची गरज होती. मार्क स्टेकेटीच्या चेंडूवर जॉर्डन सिल्कने डीप कव्हर्सला हवेत फटका मारला.


नेसेरने पकडली हैराण करुन टाकणारी कॅच

ब्रिसबेनच्या मायकल नेसेरने आपली कमाल दाखवली. तो लाँग ऑफवरुन धावत आला. बाऊंड्री लाइनजवळ कॅच पकडताना त्याला तोल सावरता आला नाही. तो बाऊंड्री लाइनच्या आत गेला. नेसेरने चेंडू हवेत उडवला. पण चेंडू सुद्धा सीमारेषेच्या आत आला. नेसेरने या ठिकाणी समजदारी दाखवली. त्याने उडी मारुन चेंडू हवेत उडवला. त्याने बाऊंड्रीच्या बाहेर जाऊन तिसऱ्या प्रयत्नात कॅच पकडली. या आश्चर्यकारक कॅचमुळे 23 चेंडूत 41 धावा करणाऱ्या सिल्कचा डाव संपला. तो सिडनीला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. पण सिडनीची टीम 209 रन्सवर ऑलआऊट झाली. ब्रिसबेनने हा सामना जिंकला.

कॅचवर प्रश्नचिन्ह

ही कॅच पाहिल्यानंतर क्रिकेटच्या जाणकारांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेत. जॉर्डन सिल्कलाही विश्वास बसला नाही. थर्ड अंपायरच्या मदतीने त्याला आऊट दिलं. नेसेरच्या या कॅचच कौतुक सुरु आहे. पण या कॅचवर काही प्रश्न सुद्धा उपस्थित झालेत. काहींच्या मते बाद देण्याचा निर्णय चुकीचा आहे. बाऊंड्रीच्या आत जाऊन चेंडू हवेत उडवला. अंपायरच्या मते, नेसेरने काहीच चुकीचं केलं नाही. सर्वकाही क्रिकेटच्या नियमांमध्ये झालं