नवी दिल्ली: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. बीसीसीआयनं फायनल साठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. इंग्लंडमधील साऊदम्पटन इंथ हा सामा होणार आहे. टीम इंडियानं जाहीर केलेल्या संघामध्ये के. एल. राहुल आणि मयांक अग्रवाल यांना संधी मिळालेली नाही त्यामुळे रोहित शर्मासोबत सलामीला शुभमन गिल येऊ शकतो. BCCI announced Team India for their 15-member squad for the WTC21 Final against New Zealand
भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.
?️ #TeamIndia announce their 15-member squad for the #WTC21 Final ? ? pic.twitter.com/ts9fK3j89t
— BCCI (@BCCI) June 15, 2021
शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे.
शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाकडून सलामीला रोहित शर्मा, शुभमन गिल येण्याची शक्यता आहे तर त्यानंतर मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिक्य रहाणे यांच्यावर असेल. रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांचा विकेट कीपर म्हणून समावेश करण्यातत आला आहे.
रविचंद्रन आश्विनच्या जोडीला रवींद्र जडेजा भारतीय फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळेल. हुनमा विहारी याचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. हनुमा विहारीचा समावेश टीम इंडिया 5 गोलंदांज किंवा एका अतिरिक्त बॅटसमन खेळवणार यावर अवलंबून असेल.
जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल.
संबंधित बातम्या:
WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?
WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!
BCCI announced Team India for their 15-member squad for the WTC21 Final against New Zealand