मुंबई: BCCI ने तब्बल चार वर्षानंतर आयपीएलची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी (Closing Ceremony) आयोजित करण्यात आली नव्हती. यावेळी भारतीय क्रिकेट बोर्डाने फॅन्ससाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) ची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. बीसीसीआय इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम सोपवणार असून त्यासाठी टेंडरही जारी केलं आहे. टेंडरसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल आयपीएलच्या साईटवर टाकण्यात आलीय. कुठलीही कंपनी एक लाख रुपये भरून टेंडर मिळवण्यासाठी अर्ज करु शकते. भरलेली रक्कम परत मिळणार नाही, असंही या टेंडरमध्ये म्हटलं आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मुलाखतीत क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचे संकेत दिले होते. कोरोनामुळे मागच्या तीन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. यापूर्वी वर्ष 2018 मध्ये क्लोजिंग सेरेमनी झाली होती.
IPL 2022 will end with the closing ceremony this year, after three years IPL will have a closing ceremony
— ANI (@ANI) April 16, 2022
IPL 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. तिथेच क्लोजिंग सेरेमनीचा कार्यक्रम होईल. BCCI ने या प्लानच्या अमलबजावणीवर काम सुरु केलं आहे. आयपीएल 2018 पासून क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. 2019 मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे क्लोजिंग सेरेमनी टाळण्यात आली होती. 2020 मध्ये कोरोनाला सुरुवात झाली. तेव्हापासून ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. आता कोरोनाचा वेग भरपूर मंदावलाय. त्यामुळे BCCI ने क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.