BCCI Contract News : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने 2022-23 सीजनसाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. बीसीसीआयने त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये एकूण 26 खेळाडूंना स्थान दिलय. ऑक्टोबर 2022 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत खेळाडूंशी करार केला आहे. A+ मध्ये चार, A मध्ये पाच, B मध्ये सहा आणि ग्रेड सी मध्ये सर्वाधिक 11 खेळाडूंना स्थान मिळालय. या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये काही खेळाडूंच प्रमोशन झालय. काही प्लेयर्सच डिमोशन झालय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये शानदार खेळ दाखवणाऱ्या सर जाडेजाच A+ मध्ये समावेश केलाय. याउलट केएल राहुल आणि शार्दुल ठाकूर सारख्या खेळाडूंना झटका बसलाय. त्यांचं डिमोशन झालय.
रहाणे कुठल्या टीम विरुद्ध शेवटचा सामना खेळला?
कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा सारख्या खेळाडूंना बाहेर करण्यात आलय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोघांच्या पुनरागमनाचे दरवाजे बंद केल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. 34 वर्षांच्या इशांत शर्माने आपला शेवटचा सामना वर्ष 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. 34 वर्षीय अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर तो टीमच्या बाहेर आहे.
अजून कुठल्या खेळाडूंना वगळलं?
भुवनेश्वर कुमार, हनुमा विहारी, दीपक चाहर आणि ऋदिमान साहा सारख्या खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान मिळालेलं नाही. ऋदिमान साहा, हनुमा विहारीच समजू शकतो, पण भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे.
टीम इंडियाच भविष्य म्हणून पाहिलं जातं होतं
भुवनेश्वरला बाहेर करण्याचा अर्थ बीसीसीआयला जास्तीत जास्त युवा वेगवान गोलंदाजांना संधी द्यायची आहे. दीपक चाहर बराच काळ दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. दीपक चाहरकडे टीम इंडियाच भविष्य म्हणून पाहिलं जातं. पण त्याच्यासारख्या गोलंदाजालाही बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान मिळालेलं नाही.