मुंबई: आयसीसी टी20 विश्व चषकाला (ICC T20 World Cup 2021) काही दिवसातच सुरुवात होत आहे. पात्रता फेरीचे सामने होताच सुपर 12 संघामध्ये लढती सुरु होऊन खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होईल. टीम इंडिया (Team India) देखील सुपर-12 स्टेजमधून स्पर्धेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी सराव म्हणून भारतीय संघ दोन संघाशी भिडणार आहे.
हे दोन संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे आहेत. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड सोबतचा सामना रद्द होऊन दक्षिण आफ्रिकेसोबत खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता आयसीसीने नव्याने पोस्ट केलेल्या वेळापत्रकात भारताचे सामने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघसोबतच असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही संघासोबत सराव सामने खेळून स्पर्धेपूर्वी भारत तयार होणार आहे.
IPL 2021 च्या अंतिम सामन्यानंतर 3 दिवसांनंतर विराटची टोळी निळी मैदानात असेल. विश्वचषकाच्या सामन्याआधी सराव सामना खेळण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी 18 ऑक्टोबर रोजी भारत इंग्लंड संघासोबत दुबईच्या मैदानावर भिडेल. तर 20 ऑक्टोबर रोजी दुबईच्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
To get in groove for the #T20WorldCup, each team will play two warm-up matches!
Check out the full fixtures ?https://t.co/FBD1fyJZGG
— T20 World Cup (@T20WorldCup) October 12, 2021
4 मे, 2021 रोजी कोरोनाच्या संकटामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल थांबवण्यात आली होती. आता हीच आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. यंदाच्या आय़पीएलमध्ये 60 सामने असून आतापर्यंत 29 सामने खेळवले गेले आहेत. त्यामुळे उर्वरीत 31 सामने आता युएईत होतील. हे सर्व सामने दुबई, शारजाह आणि अबुधाबीच्या तीनच मैदानात होणार असल्याने साहजिकच खेळपट्टी खेळून खेळून स्लो होणार ज्यामुळे फिरकीपटूंना अधिक फायदा होईल.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
इतर बातम्या
धोनीचा मनाचा मोठेपणा, आगामी विश्वचषकात मानधन न घेता मार्गदर्शन करणार, BCCI ची माहिती
(BCCI Confirms team india will play 2 warm up matches before t20 world cup with australia and England)