बीसीसीआयने विराट कोहलीला दिलं उत्तर, पत्रकार परिषदेनंतर वादाला सुरुवात

| Updated on: Dec 15, 2021 | 5:14 PM

एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता असं कोहलीने आज पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावर आता बीसीसीआयने उत्तर दिलं आहे.

बीसीसीआयने विराट कोहलीला दिलं उत्तर, पत्रकार परिषदेनंतर वादाला सुरुवात
virat kohli
Follow us on

नवी दिल्ली: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) पत्रकार परिषदेनंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विराट कोहलीचा दावा खोडून काढला आहे. कर्णधारपदाच्या विषयावर बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, कल्पना दिली नाही हा विराटचा दावा बीसीसीआयने (BCCI) फेटाळून लावला आहे. टी-20 कर्णधारपदाच्या एकूणच सर्व विषयावर विराट बरोबर चर्चा झाली होती. सप्टेंबर महिन्यात बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीशी चर्चा करुन त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. बीसीसीआय पदाधिकाऱ्याने इंडिया टुडेला ही माहिती दिली.

बैठकीच्यादिवशी सकाळी चेतन शर्मा यांनी विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबतच्या निर्णयाची माहिती दिली होती, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता असं कोहलीने आज पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावर आता बीसीसीआयने उत्तर दिलं आहे.

गांगुली काय म्हणाला होता?
“मी विराट कोहलीला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नको, असं सांगितलं होतं. सौरव गांगुलीने न्यूज १८ सोबत बोलताना हे विधान केलं होतं. विराटने मात्र आज वेगळचं सांगितलं. टी-20 चं कर्णधारपद सोडताना बीसीसीआयमधून कोणी आपल्याला अडवलं नाही. उलट हा निर्णय व्यवस्थित स्वीकारला असं सांगितलं. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोहली काय म्हणाला?
“टी-20 चे कर्णधारपद सोडण्याबाबत मी बीसीसीआयशी संपर्क साधला, त्यावेळी मी माझी बाजू त्यांना सांगितली. माझ्या निर्णयामागे ही कारणं आहेत, हे मी सांगितलं होतं. चांगल्या पद्धतीने हा निर्णय स्वीकारला गेला. मी टी-20 चे कर्णधारपद सोडू नये, असे कोणी मला सांगितले नाही” असे कोहली म्हणाला.


संबंधित बातम्या:
Virat kohli press confrence: ‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’
Virat kohli on odi series: ‘खोट्या बातम्या लिहितात त्यांना विचारा’, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
Virat kohli on odi series: ‘मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध, रोहितची उणीव जाणवेल’