मुंबई | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर टीम इंडिया थेट आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे. थोडक्यात काय तर, टीम इंडियाची वर्ल्ड कप आधीची अखेरची टी 20 मालिका आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन विंडिज आणि अमेरिकेत 1 ते 29 जून दरम्यान करण्यात आलं आहे.
टीम इंडिया या टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने तयारीला लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयही सज्ज झाली आहे. बीसीसीआयने निवड समितीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ असा की टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा नवी निवड समिती करेल.
बीसीसीआयने मुंबईकर आणि माजी खेळाडू अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी 4 जुलै 2023 रोजी नियुक्ता केली होती. या निवड समितीत अध्यक्ष आगरकर यांच्याव्यतिरिक्त इतर 4 निवडकर्ते होते. आता बीसीसीआयने निवड समितीतील पदासाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने निवडकर्ता या पदासाठी अर्ज मागवले आहेत.
बीसीसीआय निवड समितीत आगरकर यांच्या व्यतिरिक्त विविध झोनचे प्रतिनिधित्व करणारे निवडकर्ते आहेत. शिवसुंदर दास हे सेंट्रल झोनचं प्रतिनिधित्व करतात. सुब्रत बॅनर्जी हे इस्ट झोनकडून निवड समितीत आहेत. साऊथ झोनमधून श्रीधरन शरत आहेत. तर वेस्ट झोनमधून सलील अंकोल आहे. आगरकर हे देखील वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात.
विद्यमान निवड समितीत नॉर्थ झोनचं प्रतिनिधित्व करणारा निवडकर्ता नाही. वेस्ट झोनचे 2 सदस्य आहेत. त्यामुळे सलिल अंकोला यांचा पत्ता कट करुन त्या जागी नॉर्थ झोनला प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं. याचाच अर्थ असा की टी 20 वर्ल्ड कपसाठी नवी निवड समिती टीम इंडियाची घोषणा करेल.
सलील अंकोलाचा पत्ता कट होणार?
@BCCI invited an application for the post of a Selector for Senior Men’s selection committee.
Salil Ankola-will be in focus.
It was on the cards,when Ajit was selected as Selector.
He will leave his post after ODI WC 2023.(90%)North Zone.#CricketTwitter pic.twitter.com/04bPbDTlk5
— alekhaNikun (@nikun28) January 15, 2024
दरम्यान बीसीसीआयने एका जागेसाठी हे अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने सोबतच अटी आणि शर्थीही सांगितल्या आहेत. इच्छुक उमेदवाराला किमान 7 कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने अथवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असावा. तसेच अर्जदाराला क्रिकेटमधून निवृत्त होऊन 5 वर्ष झालेली असावीत. पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 25 जानेवारी आहे.