BCCI चा आदेश रोहित शर्मा, हार्दिक पंड्या मान्य करतील?

| Updated on: Mar 27, 2023 | 3:31 PM

NCA च्या मेडिकल डिपार्टमेंटचे प्रमुख नीतीन पटेल आणि टीम इंडियाचे ट्रेनर सोहम देसाई यांनी अलीकडेच 10 फ्रेंचायजींचे ट्रेनर्स आणि फिजियोथेरेपिस्टसह ऑनलाइन मीटिंग केली.

BCCI चा आदेश रोहित शर्मा, हार्दिक पंड्या मान्य करतील?
Rohit sharma
Follow us on

IPL 2023 : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग टुर्नामेंट चार दिवसांवर आली आहे. विजेतेपद मिळवणं हेच प्रत्येक टीमच लक्ष्य असेल. त्यामुळे आपल्या सर्वोत्तम खेळाडूंचा वापर करण्यावर प्रत्येक फ्रेंचायजीचा भर असेल. आयपीएल विजेतेपदाच्या शर्यतीत काही खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची शक्यता आहे. सीजन सुरु होण्याआधीच अनेक मोठे खेळाडू आयपीएल 2023 मधून आऊट झालेत. खेळाडूंच्या दुखापीत हे बीसीसीआयसमोरच सध्याच मुख्य आव्हान आहे. जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? हे अजूनही स्पष्ट नाहीय.

मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या आधी रवींद्र जाडेजाला गुडघे दुखापत झाली. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही. त्याआधी केएल राहुलही दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे खेळाडूंच्या दुखापती कशा रोखायच्या हे बीसीसीआयसमोरच आव्हान आहे.

टीम इंडियासमोर दोन मुख्य टुर्नामेंट

यंदा वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहे. त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे. या मुख्य टुर्नामेंटसाठी टीम इंडियाला फिट खेळाडू हवे आहेत. सध्याची संघाची स्थिती पाहता आणखी एक-दोन खेळाडूंच्या दुखापती परवडणाऱ्या नाहीत. टीम इंडियाला 2013 नंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

बीसीसीआयने आदेशात काय म्हटलय?

आयपीएलच्या नादात प्रमुख खेळाडूंना दुखापती होण्याचा धोका आहे. आयपीएल 2023 दरम्यान भारतीय खेळाडूंच्या वर्कलोडवर बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची नजर असेल. बीसीसीआयने त्यासाठी पाऊल सुद्धा उचललय. नवा सीजन सुरु होण्याआधी फ्रेंचायजींना आदेश दिलाय. भारतीय खेळाडूंची विशेष काळजी घ्या. गरजेपेक्षा त्यांचा जास्त वापर करु नका, असं बीसीसीआयने फ्रेंचायजींना सांगितलय.

आयपीएल फ्रेंचायजींचा रोल महत्वाचा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, NCA च्या मेडिकल डिपार्टमेंटचे प्रमुख नीतीन पटेल आणि टीम इंडियाचे ट्रेनर सोहम देसाई यांनी अलीकडेच 10 फ्रेंचायजींचे ट्रेनर्स आणि फिजियोथेरेपिस्टसह ऑनलाइन मीटिंग केली. त्यावेळी त्यांना बीसीसीआयच्या आदेशाबद्दल सांगितलं. बीसीसीआयला बॉलर्सच सर्वात जास्त टेन्शन आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये भारतीय बॉलर्सकडून गरजेपेक्षा जास्त गोलंदाजी करुन घेऊ नका, असं आयपीएल फ्रेंचायजींना सांगण्यात आलय.

रोहित-हार्दिक ऐकतील का?

आता प्रश्न हा आहे की, फ्रेंचायजी बीसीसीआयच ऐकतील का? कारण दोन महिन्यांसाठी हे खेळाडू फ्रेंचायजींच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधलेले असतात. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या आयपीएल टीमचे कॅप्टन आहेत. ते बीसीसीआयच्या आदेशाची आपल्या टीममध्ये अमलबजावणी करतील का? हा सवाल आहे.