मुंबई: T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवानंतर BCCI ने मागच्या आठवड्यात तडकाफडकी निवड समिती बर्खास्त केली. बीसीसीआयने नव्याने निवड समितीची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. निवड समिती सदस्यपदासाठी अर्ज करण्याकरीत 28 नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे. बीसीसीआयकडे सिलेक्टर्सच्या 5 जागा आहेत. या पाच जागांसाठी बीसीसीआयला आतापर्यंत 80 अर्ज प्राप्त झाले आहेत.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचं नाव आघाडीवर, पण….
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण एकाच झोनचे दोन सिलेक्टर सिनियर आणि ज्यूनियर सिलेक्शन कमिटीवर नेमण्यास बीसीसीआय फार उत्सुक नाही. तामिळनाडूचे आणखी एक माजी क्रिकेटपटू शरद श्रीधरन ज्यूनियर सिलेक्शन कमिटीचे चेयरमन आहेत.
नवीन निवड समिती कधी अस्तित्वात येणार?
निवड समितीवर स्थान मिळवण्यासाठी माजी क्रिकेटपटूंना सोमवार 28 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. डिसेंबरच्या मध्यावर नवीन समिती अस्तित्वात येऊ शकते. नवीन समिती अस्तित्वात येईपर्यंत चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी कामकाज पाहिलं.
शिवरामकृष्णन यांच्या निवडीत अडचण काय?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम निवडणं हे नव्या निवड समितीसमोरच मुख्य आव्हान असेल. लक्ष्मण शिवरामकृष्णन हे दक्षिण झोनमधून मजबूत उमेदवार आहेत. पण त्यांना पॅनलवर संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. एकाच राज्याचे दोन सिलेक्टर्स सिनियर आणि ज्यूनियर कमिटीवर नेमण्यास बीसीसीआय अनुकूल नाही.
मागच्यावेळी शिवरामकृष्णन यांची निवड का नाही झाली?
मागच्यावेळी सुद्धा शिवरामकृष्णन यांचं नाव आघाडीवर होतं. तामिळनाडू क्रिकेट असोशिएशनधील प्रमुख नाव एन. श्रीनिवासन यांचा त्यांना पाठिंबा होता. पण माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या समर्थनामुळे चेतन शर्मा अध्यक्ष झाले. आता चेंडू रॉजर बिन्नी यांच्या कोर्टात आहे. श्रीनिवासन यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.
अजित आगरकरांना जास्त संधी, कारण….
अजित आगरकर यांनी निवड समितीवर जाण्यासाठी अर्ज केला, तर त्यांची अध्यक्षपदी नेमणूक होऊ शकते. बीसीसीआयने टी 20 चा अनुभव असलेल्या सिलेक्टरला प्राधान्य दिलं आहे. अजित आगरकर टीम इंडियाकडून 4 आणि आयपीएलमध्ये 62 टी 20 सामने खेळले आहेत. अनुभवाच्या आधारावर आगरकर यांच पारड जड आहे.