मुंबई: टीम इंडियाचा (Team india) माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) भारताच्या T-20 क्रिकेट संघातील आपलं स्थान गमावणार का? तर, या प्रश्नाचं उत्तर आहे, हो असं घडू शकतं. विराट कोहलीच्या टी 20 संघातील स्थानाला धोका आहे. विराट कोहलीचा सध्याच्या फॉर्म हा त्याच्यासाठीच नाही, टीम इंडियासाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य आणि बीसीसीआय़ (BCCI) पदाधिकाऱ्यांची विराट कोहलीच्या फॉर्मवर नजर आहे. विराट कोहलीच्या भारताच्या टी 20 क्रिकेट संघातील भवितव्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. विराटच्या फॉर्मने निवड समिती आणि बीसीसीआयची सुद्धा चिंता वाढवली आहे. कोहलीच्या फॉर्मची निवड समिती सदस्यांमध्ये चर्चा सुरु आहे, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे. इनसाइडस्पोर्ट्सने हे वृत्त दिलं आहे.
“विराटने भारतीय क्रिकेटची भरपूर सेवा केली आहे. पण त्याचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे” असं बीसीसीआय पधिकाऱ्याने सांगितलं. या बद्दल अधिक विचारणा केल्यानंतर सिलेक्टर्स याबद्दल ठरवतील, असं उत्तर दिलं. “निवड समितीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. विराट आणि अन्य कोणाबद्दल निर्णय सिलेक्टर्सना घ्यायचा आहे. आम्ही आमचं मत त्यांना सांगत नाही. सध्या काय चाललय, त्याची त्यांना कल्पना आहे” असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
सध्या सुरु असलेल्या आय़पीएलमध्ये विराट कोहली खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीयत. काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तो सलामीला आला. पण त्याने काहीच बदललं नाही. विराट नऊ धावांवर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली मैदानावर आल्यानंतर संघर्ष करताना दिसतो. तो आऊट झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या रिअॅक्शन्स असतात, त्यातून त्याच्यात आत्मविश्वास दिसत नाही.
इनसाडइ स्पोटर्सने दोन राष्ट्रीय निवडकर्त्यांशी संपर्क साधला पण त्यांनी बोलण्यास नकार दिला. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना फोन केला, तेव्हा त्यांनी मला या विषयावर बोलायचं नाही, असं सांगून फोन डिसकनेक्ट केला.
IPL 2022 मध्ये असं आहे विराट कोहलीचं वेगवेगळ्या संघांविरुद्धचं प्रदर्शन
पंजाब किंग्स – 41
केकेआर – 12
राजस्थान रॉयल्स – 5
मुंबई इंडियन्स – 48
सीएसके – 1
दिल्ली कॅपिटल्स – 12
लखनौ सुपर जायंट्स – ०
एसआरएच – ०
राजस्थान रॉयल्स – ०