IND vs PAK: टीम इंडियाच्या पाकिस्तानात दौऱ्याबाबत महत्त्वाची बातमी

| Updated on: Oct 14, 2022 | 1:55 PM

IND vs PAK: टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याबाबत आता BCCI चा काय स्टँड आहे? त्यात बदल झालाय?

IND vs PAK: टीम इंडियाच्या पाकिस्तानात दौऱ्याबाबत महत्त्वाची बातमी
T20 World Cup 2022
Image Credit source: icc
Follow us on

मुंबई: टीम इंडिया (Team India) बऱ्याच वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan Tour) गेलेली नाही. दोन्ही टीम्समध्ये द्विपक्षीय सीरीज झालेली नाही. आयसीसी टुर्नामेंटसाठी सुद्धा पाकिस्तानात जाण्यासाठी भारताकडून अनुकूलता नव्हती. पुढच्यावर्षी आशिया कप (Asia cup) स्पर्धा होणार आहे. त्याचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलय. बीसीसीआय आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास तयार आहे, असा काही मिडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय. पण यासाठी बीसीसीआयला सरकारची परवानगी लागेल.

टीम इंडिया याआधी कधी पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती?

भारत आणि पाकिस्तानच्या टीम सध्या फक्त आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कपमध्येच खेळतात. 2008 पासून दोन्ही टीम्समध्ये कुठलीही द्विपक्षीय सीरीज झालेली नाही. भारतीय टीमने यापूर्वी 2008 साली पाकिस्तानचा दौरा केला आहे.  कराचीमध्ये टीम इंडियाने दोन वनडे सामने खेळले. दोन्ही टीम्सनी 1-1 सामना जिंकला होता.

टीम इंडियाच शेड्युल कसं आहे?

बीसीसीआयने गुरुवारी सर्व राज्य असोशिएशन्सना नोट पाठवली आहे. यात टीम इंडियाच पुढच्यावर्षाच शेड्युल आहे. नोटनुसार टीम इंडिया पुढच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यानंतर अंडर 19 टी 20 वर्ल्ड कप आहे. पाकिस्तानात होणारा आशिया कपही प्लानचा भाग आहे. पाकिस्तानात पुढच्यावर्षी वनडे फॉर्मेटमध्ये आशिया कप स्पर्धा होईल. आशिया कपनंतर भारतात वर्ल्ड कप होणार आहे.

सरकारची परवानगी गरजेची

एजीएम नोटनुसार भारत सरकारने परवानगी दिली, तरच बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवेल. मागच्यावर्षी पाकिस्तानला यजमानपद दिलं. त्यावेळी बीसीसीआय तयार नव्हती. त्यामुळे आशिया कप यूएईमध्ये आयोजित करावा लागला. क्रिकबजने या संदर्भात बीसीसीआय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असं सांगितलं. हा विषय सरकारच्या अधिकारक्षेत्रात येतो, असं त्यांनी सांगितलं.