‘आम्हाला छोट्या फायद्यात…’ BCCI सचिव जय शाहंच PCB प्रमुख रमीझ राजांना कडक उत्तर

| Updated on: Feb 07, 2022 | 2:02 PM

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने (PCB) चौरंगी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पीसीबीच्या या प्रस्तावासाठी अनुकूल नाहीय. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशी चार देशांची चौरंगी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. बीसीसीआय सचिव जय शाह (Jay shah) यांनी […]

आम्हाला छोट्या फायद्यात... BCCI सचिव जय शाहंच PCB प्रमुख रमीझ राजांना कडक उत्तर
ramiz raja-jai shah
Follow us on

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने (PCB) चौरंगी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पीसीबीच्या या प्रस्तावासाठी अनुकूल नाहीय. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशी चार देशांची चौरंगी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. बीसीसीआय सचिव जय शाह (Jay shah) यांनी पीसीबीच्या प्रस्तावासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिले आहेत. क्रिकेटचा विस्तार हेच जगभरातील क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांच लक्ष्य असलं पाहिजे. छोट्या व्यावसायिक उपक्रमांपेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे, असं जय शाह यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

जो नफा होईल, तो…
“मी ICC ला चार देशांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव देईन. या स्पर्धेतून जो नफा होईल, तो टक्केवारीच्या आधारावर आयसीसीच्या सदस्य देशांमध्ये वितरीत करु” असे रमीझ राजा म्हणाले होते. भारत-पाकिस्तानमध्ये 2012-13 पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशात गेल्या कित्येक वर्षात क्रिकेट मालिका झालेली नाही.

मागच्या काही वर्षात फक्त ICC च्या स्पर्धांमध्येच भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले आहेत. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट चाहत्यांची संख्या मोठी आहे. दोन्ही बाजूंना पराभव मान्य नसतो. दोन्ही देशांमधल्या क्रिकेट सामन्यांची नेहमीच बरीच चर्चा होते. 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पण मागच्यावर्षी टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारतावर विजय मिळवला. यावर्षी 23 ऑक्टोबरला मलेबर्नच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये टी 20 वर्ल्डकपचा सामना होणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट
“कसोटी क्रिकेटवर भर देतानाच द्विपक्षीय क्रिकेट सुरक्षित ठेवणं, ही आमची पहिली जबाबदारी आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश व्हावा, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे खेळाचा आणखी विकास होईल. खेळाचा विस्तार हे मोठं आव्हान आहे. कुठल्याही छोट्या व्यावसायिक उपक्रमापेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे” असं जय शाह म्हणाले.

BCCI secretary Jay Shah responds to Ramiz Rajas 4-nation T20I series proposal calls it ‘short-term commercial initiative’