मुंबई: इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) आगामी तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यासाठी काल संघाची घोषणा करण्यात आली. आजपासून इंग्लंड विरुद्ध एजबॅस्टन मध्ये एकमेव कसोटी सामना सुरु होणार आहे. ही कसोटी झाल्यानंतर वनडे आणि टी 20 सीरीजला सुरुवात होईल. टी 20 सामन्यांची मालिका 7 जुलैपासून तर वनडे सीरीज 12 जुलैपासून सुरु होईल. रोहित शर्माच्या (Rohti Sharma) नेतृत्वाखाली खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत विराट कोहली (Virat kohli) आणि रवींद्र जाडेजाचा दुसऱ्या टी 20 पासून संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहचा सुद्धा संघात समावेश करण्यात आला आहे. आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्यात अर्शदीप सिंहला संधी मिळाली नाही. पण त्याला इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे.
अर्शदीप डेथ ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी करु शकतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने आपलं कौशल्य दाखवून दिलं. त्यामुळे टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. यॉर्कर चेंडूंवर त्याचं प्रभुत्व आहे. वेगवान गोलंदाजीने ओळख निर्माण करणारा जम्म एक्स्प्रेस उमरान मलिकलाही टी 20 संघात स्थान मिळालं आहे.
नुकत्याच संपलेल्या आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्यांच्या मालिकेत त्याला संधी मिळाली होती. पहिल्या टी 20 मध्ये तो प्रभावित करु शकला नाही. त्याच्या वाट्याला अवघं एक षटक आलं. पण दुसऱ्या सामन्यात त्याने चमक दाखवून दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये आयर्लंडला 17 धावा करु दिल्या नाही. धक्कादायक बाब म्हणजे आयर्लंड विरुद्ध प्रभावी खेळ दाखवूनही संजू सॅमसनला संपूर्ण टी 20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही.
NEWS ? – #TeamIndia’s squad for T20I & ODI series against England announced.
More details ? #ENGvIND https://t.co/ii121ge0jY
— BCCI (@BCCI) June 30, 2022
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा,