मुंबई : ICC ची पुढची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 आणि वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये होणार आहे. या दोन्ही टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा नव्या खेळाडूकडे असू शकते. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती व्हाइट बॉल म्हणजे वनडे क्रिकेटमधील भविष्यासंदर्भात रोहित शर्मा बरोबर चर्चा करणार आहे. पुढची 2027 वनडे वर्ल्ड कप स्पर्धा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. त्यावेळी रोहित शर्माच वय 40 असेल. पुढच्यावर्षी 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप स्पर्धा होईल. अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये ही वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. त्यावेळी रोहित शर्माच वय 37 वर्ष असेल. तो पर्यंत रोहित टीम इंडियाकडून खेळण्याची शक्यता कमी आहे. T20 सीरीजसाठी आधीपासूनच त्याचा आणि विराट कोहलीचा विचार होत नाहीय. टीम इंडियाच्या मागच्या काही T20 मालिकांसाठी रोहितची निवड करण्यात आली नव्हती.
T20 फॉर्मेटमध्ये माझ्यापलीकडे विचार करा, हा संदेश रोहितने निवड समिती सदस्यांना दिला आहे असं टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलय. ” T20 सीरीजसाठी माझा विचार केला नाही, तर काही प्रॉब्लेम नाही” असं वनडे वर्ल्ड कपआधी रोहितने निवड समिती सदस्यांना कळवलं होतं. T20 साठी निवड समिती मोठ्या प्रमाणात युवा वर्गाला प्राधान्य देत आहे. पुढच्यावर्षी जून महिन्यात T20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपला काही महिने शिल्लक आहेत.
वनडे कॅप्टन म्हणून रोहित शर्माची ही शेवटची सीरीज ठरणार का?
T20 क्रिकेट खेळायच नाहीय, हे रोहितने स्पष्ट केलय. सिलेक्टर्स त्याच्याबरोबर आता वनडेमधील भवितव्याबाबत चर्चा करणार आहेत. 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत दोन सामन्या्ची कसोटी मालिका खेळण्याआधी टीम इंडिया तीन वनडे खेळणार आहे. टेस्टमध्ये खेळण्याआधी वनडे सीरीज तयारीच्या दृष्टीने सिनियर्ससाठी एक चांगली संधी आहे, असं बीसीसीआयच्या सिलेक्टर्सना वाटतं. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाहीय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज ही रोहित शर्माची वनडे कॅप्टन म्हणून शेवटची मालिका ठरु शकते.