लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना अनिर्णीत सुटला. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 157 धावांची गरज असताना पावसाच्या व्यत्ययामुळे सामना खेळवता आला नाही. त्यामुळा आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय खेळाडूही लॉर्ड्सवर पोहोचले असून कसून सराव करत आहे. बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये फिल्डींग कोच आर. श्रीधर (R Sridhar) खेळाडूंचा सराव घेत आहेत.
व्हिडीओमध्ये श्रीधर हे फलंदाजी करत आहेत. तर मागे यष्टीरक्षक ऋषभ पंत असून गोलंदाजीसाठी प्रसिध कृष्णा आहे. सोबत हनुमा विहारी आणि रिद्धिमन साहा हे दोघेही व्हिडीओत आहेत. श्रीधर या सर्वांचा सराव घेत असून या व्हिडीओला ‘कसा वाटला हा नवा सराव?’ असं कॅप्शन देत बीसीसीआयने शेअर केलं आहे. तर तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…
How is that for a drill? Fielding coach @coach_rsridhar keeping the boys on their toes. #TeamIndia #ENGvIND @RishabhPant17 • @Wriddhipops • @prasidh43 • @Hanumavihari pic.twitter.com/LjER4lgFV0
— BCCI (@BCCI) August 10, 2021
दुसऱ्या सामन्यासाठी सर्व भारतीय खेळाडू कसून सराव करत असले तरी लॉर्ड्सवर भारतीय फलंदाजाची कामगिरी चिंतेचा विषय आहे. कर्णधार कोहलीने लॉर्ड्सवर आतापर्यंत चार डावांत केवळ 65 धावा केल्या आहेत. ज्यात 25 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. विराटनंतर भारताचे इतर फलंदाजही लॉर्ड्सवर आतापर्यंत खास कामगिरी करु शकलेले नाहीत. यात सर्वात विश्वासू फलंदाज असणाऱ्या चेतेश्वर पुजाराही संध्या खास फॉर्ममध्ये नसून मागील 32 डावात एकही शतक ठोकू शकलेला नाही. त्याने लॉर्ड्सवरील दोन सामन्यांतील चार डावात केवळ 89 धावा केल्या आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत लॉर्ड्सवर अद्यापर्यंत एकही सामना खेळलेले नाहीत. केएल राहुलने देखील दोन डावात केवळ 18 धावा बनवल्या आहेत. संपूर्ण संघात केवळ मराठमोळा अजिंक्य रहाणेचीच लॉर्ड्सवरील कामगिरी दिलासादायक आहे. त्याने 2014 साली 103 धावांची शतकी खेळी करत मालिकेतील एकमेव सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता.
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट (सामना अनिर्णीत)
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
हे ही वाचा
(BCCI Shares Video of fielding Coach R Sridhar taking practice of indian players at lords)