मुंबई: भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) सुरुवातच खराब केली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाकडून 10 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर सर्व संघावर टीका केली जात होती. पण यावेली रागाच्या भरात काही नेटकऱ्यांनी अतिशय चूकीच्या पद्धतीने मोहम्मद शमीला पराभवाचा जबाबदार ठरवत त्याच्या धर्मालरुन टीका केली. शमी ट्रोल होताच अनेक आजी माजी क्रिकेटपटू त्याच्या समर्थनार्थ समोर आले. त्यानंतर आता जवळपास 48 तासानंतर बीसीसीआयने शमीला पाठिंबा दर्शवत एक ट्विट केलं आहे.
पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या विरोधात ट्विटरवर अनेक गोष्टी लिहिल्या जात होत्या. त्यानंतर सर्वात आधी सेहवागने ट्विट करत शमीला पाठिंबा दर्शवला, ज्यानंतर अनेकांनी ट्विट केलं. आकाश चोप्राने तर थेट त्याचा ट्विटरचा फोटो बदलून शमीचा फोटो ठेवला.
या सर्वानंतर बीसीसीआयनेही ट्विट करत शमीला पाठिंबा दर्शवला. या ट्विटमध्ये बीसीसीआयने सामन्यातील शमीचा विराट सोबतचा एक फोटो ट्विट करत लिहिलं आहे की, ‘गर्व (या शब्दासमोर तिरंग्याचा इमोजी लावला आहे), मजबूत, पुढे आणि सर्वोच्च. असे पाच शब्द लिहित आम्हाला शमीवर गर्व असून तो मजबूतीने पुढे जाईल असं बीसीसीआय म्हणून इच्छित असल्याचं अनुमान लावलं जात आहे.
Proud ??
Strong ?
Upward and onward ? pic.twitter.com/5NqknojVZj— BCCI (@BCCI) October 26, 2021
शमीवरील टीकेनंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने अशा लोकांना खडसावले आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे की, मोहम्मद शमीवरील ऑनलाइन हल्ल्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही मोहम्मद शमीच्या पाठीशी उभे आहोत, तो एक चॅम्पियन आहे आणि जो कोणी खेळाडू इंडियन कॅप परिधान करतो त्याच्या मनात भारत आहे. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत, पुढील सामन्यात तुझा जलवा दाखव.
The online attack on Mohammad Shami is shocking and we stand by him. He is a champion and Anyone who wears the India cap has India in their hearts far more than any online mob. With you Shami. Agle match mein dikado jalwa.
— Virender Sehwag (@virendersehwag) October 25, 2021
इतर बातम्या
‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग
India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ
(BCCI Supported mohammed shami by tweeting when he gets trolled on social media after india vs pakistan match)