मुंबई: T20 क्रिकेटच्या फॅन्सना पुढच्या काही दिवसात आणखी रोमांचक सामने पहायला मिळू शकतात. कारण पुरुषांप्रमाणे आता महिला IPL आकाराला येत आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बऱ्याच कालावधीनंतर महिला आयपीएल सुरु करण्यासाठी पावलं उचलली आहेत. मार्च 2023 मध्ये पहिला सीजन आयोजित करण्याची योजना आहे. त्यासाठी BCCI वेगाने काम करतेय. यासाठी बीसीसीआयने खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनपासून फ्रेंचायजी विक्रीची योजना बनवली आहे. IPL फ्रेंचायजी प्रत्येक जण विकत घेऊ शकत नाही. पण महिला आयपीएलची फ्रेंचायजी विकत घेण्यासाठी खिशात किती रक्कम हवी, ते जाणून घ्या.
BCCI ने जारी केलं टेंडर
BCCI ने अलीकडेच महिला आयपीएलच्या पाच फ्रेंचायजी खरेदीसाठी टेंडर जारी केलं होतं. बीसीसीआयने या अंतर्गत महिला आयपीएल टीम विकत घेण्यासाठी टेंडर मागवले आहेत. पुरुष आयपीएलची फ्रेंचायजी असणाऱ्यांसह अन्य कंपन्यासुद्धा फ्रेंचायजी विकत घेण्यासाठी दावा करु शकतात. पण महिला आयपीएल टीम विकत घेण्यासाठी काही अटी-शर्थींच पालन कराव लागेल.
टीम विकत घेण्यासाठी अकाऊंटमध्ये इतके हजार कोटी हवे?
ज्या कंपनीला किंना कुठल्या खासगी पार्टीला महिला IPL टीम विकत घ्यायची असेल, तर त्यांच्या बँकेत कमीत कमी 1000 कोटी रुपये हवेत. बीसीसीआयने ही अट ठेवलीय. क्रिकेट वेबसाइट क्रिकबजने हे वृत्त दिलय. पुरुष आयपीएलशी तुलना केल्यास, 2021 मध्ये दोन नव्या फ्रेंचायजी विकत घेण्यासाठी बीसीसीआयने बेस प्राइस 3 हजार कोटी रुपये ठेवली होती.
छोटे-छोटे भागीदार एकत्र येऊ शकतात ?
बीसीसीआयने एक अट ठेवलीय. कंसोर्टियम म्हणजे छोटे-छोटे भागीदार एकत्र येऊन बोली लावू शकत नाही. म्हणजे ज्याला कोणाला फ्रेंचायजी विकत घ्यायची असेल, त्याला एक पार्टी म्हणून फ्रेंचायजी खरेदी करावी लागेल.
महिला आयपीएलचे टीम मालक कोण? ‘या’ तारखेला घोषणा
फ्रेंचायजी खरेदीसाठी बीसीसीआयने शेवटची तारीख 21 जानेवारी ठेवली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र घेण्यासाठी आवेदकाला 5 लाख रुपये जमा करावे लागतील. 23 जानेवारी अर्जाची छाननी होईल. कुठल्याही आवेदकाच्या कागदपत्रात कुठलीही कमतरता असेल, तर बोर्डाला तो अर्ज बाद ठरवण्याचा अधिकार आहे. 25 जानेवारीला बीसीसीआय महिला आयपीएलच्या 5 फ्रेंचायजी मालकांची घोषणा करेल.