IND vs ENG 1st Test | हैदराबाद येथे 28 जानेवारीच्या संध्याकाळी जे झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. जिंकलेली मॅच टीम इंडियाने गमावली. शेवटी हे कसं झालं? चार दिवस चाललेल्या या कसोटी सामन्यात पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर टीम इंडियाच वर्चस्व होतं. अचानक त्यांच्या हातातून सामना कसा निसटला?. या प्रश्नाच उत्तर मॅच संपल्यानंतर रोहित शर्माकडे सुद्धा नव्हतं. पुढे असं घडू नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक आहे, Action. खासकरुन वारंवार संधी मिळूनही अपयशी ठरणाऱ्या खेळाडूंवर.
कोण आहेत ते खेळाडू? ज्यांच्यामुळे मायदेशात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली? मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्माने केलेलं एक विधान लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. टीम इंडियाकडून काय चूक झाली? पराभवानंतर रोहित शर्मासमोर हा प्रश्न आला, तेव्हा त्याने उत्तर कठीण असल्याच सांगितलं. नेमक काय चुकलं, त्याच आम्ही विश्लेषण करु. टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार असणाऱ्या खेळाडूंबद्दल रोहित शर्माने अजूनही काही ठरवलं नाही, तर टीम इंडियाला त्याची किंमत चुकवावी लागेल.
आता कुठलातरी ठोस निर्णय घेण्याची वेळ
टेस्ट क्रिकेटमध्ये एक, दोन नाही, टीम इंडियाचे जे प्लेयर वारंवार अपयशी ठरतायत, हैदराबादमध्येही त्यांची तीच स्थिती होती. या पराभवानंतर टीम इंडियाच्या दोन खेळाडूंची नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत, ती म्हणजे शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये या दोन खेळाडूंच्या स्थानाबद्दल आता कुठलातरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये होणार आहे.
फक्त 6 वेळा फिफ्टी प्लस धावा करु शकलाय
हैदराबाद टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये गिलने फक्त 23 धावा केल्या, तेच अय्यरने 35 रन्स. चेज करताना या दोन फलंदाजांकडून जास्त अपेक्षा होत्या. पण गिल खातही उघडू शकला नाही. अय्यरची गाडी 13 धावांवर अडखळली. कसोटीच्या मागच्या 11 इनिंगमध्ये गिल आणि अय्यर दोघांनी एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही. गिलची टेस्ट करीअरमध्ये सरासरी 30 पेक्षा कमी आहे. तेच श्रेयस अय्यर 22 कसोटी इनिंगमध्ये फक्त 6 वेळा फिफ्टी प्लस धावा करु शकलाय.
फक्त मोठ्या खेळाडूंना रिप्लेस करुन काही होत नाही
इंग्लंड विरुद्धच्या चालू टेस्ट सीरीजमध्ये या दोन प्लेयरकडून भरपूर अपेक्षा आहेत. पुजारा सारख्या प्लेयरला बाहेर बसवून अय्यरवर विश्वास दाखवलाय. बॅटिग ऑर्डरमध्ये गिल विराट कोहलीच्या स्थानावर खेळत होता. फक्त मोठ्या खेळाडूंना रिप्लेस करुन काही होत नाही, त्यांच्यासारख परफॉर्म करण सुद्धा आवश्यक आहे. यात गिल आणि अय्यर दोघे अपयशी ठरले. एक चांगल झालं, पहिल्या कसोटीतच हे दिसलं. टीम इंडियाकडे मालिका जिंकण्यासाठी अजून चार कसोटी सामने आहेत.