IND vs SA 2nd Test | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण पराभव झाल्यास मालिका टीम इंडियाच्या हातातून जाईल. पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये झाला. त्यावेळी टीम इंडियाने तीन दिवसात गुडघे टेकले. आता केपटाऊनमध्ये काय होणार? ते वेळच ठरवेल. पण या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर शाब्दीक हल्ला झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज खेळाडूने रोहितच्या टेक्निकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.
सेंच्युरियन कसोटीच्या दोन्ही डावात फ्लॉप झालेल्या रोहित शर्माच्या टेक्निकवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय. दक्षिण आफ्रिकेत रोहितला धावा करायच्या असतील, तर त्याला आपल्या टेक्निकमध्ये बदल करावा लागेल, असलं दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज डॅरिल कलिनन यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत फलंदाजी करताना तुम्हाला पुढे येऊन खेळाव लागेल असं कलिनन यांनी द टेलीग्राफशी बोलताना सांगितलं. “मागच्या 30 वर्षांपासून आशियाई फलंदाज जी चूक करतात, तीच चूक रोहित शर्मा करतोय असं कलिनन यांनी म्हटलय. आशियाई फलंदाज दक्षिण आफ्रिकेत पुढेही जात नाहीत, मागेही येत नाहीत, ते पेस आणि बाऊन्सला घाबरतात असं वाटतं” असं कलिनन यांचं निरीक्षण आहे.
रोहितचा दक्षिण आफ्रिकेत इतका खराब रेकॉर्ड
“रबाडा लेंग्थ आणि शॉर्ट बॉल्स कमालीचे टाकतो. त्यामुळे तो जेव्हा चेंडू पुढे टाकतो, त्यावेळी त्याच्याविरोधात सॉलिड डिफेन्स असण आवश्यक आहे” असं कलिनन म्हणाले. भारतीय फलंदाज आपल्या देशात क्रीजमधूनच खेळू शकतात. पण दक्षिण आफ्रिकेत असं नाहीय. त्यामुळेच रोहित शर्माचा रबाडाविरोधात इतका खराब रेकॉर्ड आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण रबाडाने रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 13 वेळा आऊट केलय. तो एकमेव गोलंदाज आहे, ज्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहितला 0 वर बाद केलय. रोहित शर्माचा दक्षिण आफ्रिकेत रेकॉर्डही खूप खराब आहे. तो तिथे कधीच अर्धशतक झळकवू शकलेला नाही. आता रोहित शर्मा केपटाऊन कसोटीत या टीकेला कसं उत्तर देतो, ते दिसेलच.