IPL 2023 : 6,6,6,6,6…IPL सुरु होण्याआधी SIX चा पाऊस, दिल्लीकडे ऋषभ पंतचा भक्कम पर्याय

| Updated on: Mar 26, 2023 | 2:35 PM

IPL 2023 सुरु होण्याआधी दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठी गुड न्यूज. आयपीएल सुरु होण्याआधीच या खेळाडूने मोठा धमाका केलाय. ऋषभ पंतची उणीव जाणवू न देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

IPL 2023 : 6,6,6,6,6...IPL सुरु होण्याआधी SIX चा पाऊस, दिल्लीकडे ऋषभ पंतचा भक्कम पर्याय
Follow us on

WI vs SA : IPL 2023 सुरु होण्याआधी दिल्ली कॅपिटल्सकडे एक मोठी गुड न्यूज आहे. आयपीएल 2023 सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूने 238.89 च्या स्ट्राइक रेटने धावा ठोकल्या. त्याने लांबलचक सिक्स मारले. त्यामुळे दिल्लीच्या टीमला मोठा दिलासा मिळाला असेल. दिल्लीची टीम आधीच अडचणीत आहे. या टीमचा कॅप्टन ऋषभ पंत अपघातामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीय. सिक्सचा पाऊस पाडणारा हा प्लेयर ऋषभ पंतची कमतरता भरुन काढू शकतो.

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रोव्हमॅन पॉवेलने आयपीएल सीजन सुरु होण्याआधीच टीम मॅनेजमेंटला खूश केलय. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामना झाला.

हल्लाबोल, जाम धुतलं

या मॅचमध्ये रोव्हमॅन पॉवेलने इतकी जबरदस्त बॅटिंग केली की, त्याचा आवाज दिल्लीपर्यंत ऐकू आला. पॉ़वेलने 18 चेंडूचा सामना केला. त्याने 43 धावा चोपल्या. वेस्ट इंडिजच्या या क्रिकेटरने 5 लांबलचक सिक्स मारले.

मॅच फिनिशरची भूमिका

दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कॅप्टन ऋषभ पंतच्या कारला मागच्यावर्षाच्या अखेरीस भीषण अपघात झाला. तो यंदाच्या आय़पीएल सीजनला मुकणार आहे. त्याच्याजागी रोव्हमॅन पॉवेल फिट बसू शकतो. तो ऋषभची कमतरता जाणवू देणार नाही. ऋषभ पंतकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोव्हमॅन पॉवेल मॅच फिनिशरची भूमिका वठवू शकतो.

दक्षिण आफ्रिकेला किती विकेटने हरवलं?

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेवर 3 विकेट राखून विजय मिळवला. या मॅचचा हिरो रोव्हमॅन पॉवेलने 18 चेंडूचा सामना करताना 43 धावा तडकावल्या. त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. दक्षिण आफ्रिकेने 11 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 131 धावा केल्या. वेस्ट इंडिजने 10.3 ओव्हर्समध्ये हा टार्गेट गाठलं.