कोलंबो : आशिया कपमधील खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तानी टीममध्ये बदल होणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता श्रीलंकेवर याचा जास्त परिणाम झालाय असं दिसतय. दासुन शनाका श्रीलंकन क्रिकेट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. अशा बातम्या येत आहेत. काहीवेळात श्रीलंकन क्रिकेट बोर्ड या बद्दल बैठक घेणार आहे. यात दासुन शनाकाला कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा दारुण पराभव केला. त्यानंतर दासुन शनाकावर चौफेर टीका झाली होती. ढगाळ हवामानात टॉस जिंकून फलंदाजी घेण्याच्या निर्णयावर अनेकांना प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या पराभवानंतर शनाकाच्या कॅप्टनशिपवर टांगती तलवार होती. वर्ल्ड कपआधी श्रीलंकन क्रिकेटमध्ये हाच मोठा बदल ठरु शकतो.शनाकाला जी किंमत चुकवावील लागतेय तितका तो खराब कॅप्ट नाहीय. आकडेच याचा पुरावा आहेत. आता या परिस्थितीत श्रीलंकेच कॅप्टन कोण होणार? वनडे वर्ल्ड कपमध्ये दासुन शनाकाच्या जागी श्रीलंकेचा नवीन कॅप्टन कोण असेल? जी माहिती मिळतेय, त्यानुसार कुसल मेंडिस याची शनाकाच्या जागी श्रीलंकेच्या कर्णधारपदी वर्णी लागू शकते.
शनाकाच्या नेतृत्वात कशी आहे श्रीलंकेची कामगिरी?
शनाकाने 37 मॅचमध्ये श्रीलंकेच नेतृत्व केलं. यात 23 सामन्यात विजय मिळवून दिला. 14 सामन्यात पराभव झाला. म्हणजे शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या विजयाची टक्केवारी 60.5 आहे. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 वर्षानंतर वनडे सीरीज जिंकली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 12 वर्षानंतर सीरीज जिंकली. 2022 मध्ये श्रीलंकेने आशिया कप जिंकला. वर्ल्ड कप क्वालिफायर टुर्नामेंट जिंकली. 2023 साली पुन्हा एकदा आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचले.
Important meeting coming up at SLC shortly with Dasun Shanaka expected to step down as captain. Kusal Mendis has emerged as front runner to take over. Spare a thought for Dasun. You won’t find a more friendlier captain with people and someone who’s extremely nice to his players.
— Rex Clementine (@RexClementine) September 20, 2023
फॉर्म गडबडला पण कॅप्टनशिप नाही
दासुन शनाकाचा फॉर्म सध्या फार चांगला नाहीय, हे खरय. भारताविरुद्ध आशिया कपच्या फायनलमध्ये पराभव झाला. म्हणून त्याच नेतृत्व चांगल नाहीय, असं म्हणू शकत नाही. शनाकाची कामगिरी इतकी खराब नसताना, श्रीलंकन क्रिकेट बोर्ड शनाकाला कर्णधारपदावरुन हटवण्याच्या निर्णयाप्रत का पोहोचलय?. कुसल मेंडीसला कॅप्टन बनवलं, तर तो शनाका इतकाच फ्रेंडली, चांगला टीममेट बनू शकतो का? हा प्रश्न आहे.